पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत चहापानाला भारत २३५ वर ३ अशा सुस्थितीत आहे. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने शतकी तर केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली.
पहिल्या दोन सामन्यातील गेल्या सामन्यातील शतकवीर चेतेश्वर पुजारा मात्र ८ धावांवर बाद झाला. श्रीलंकेकडून लक्षण संदकनने पुजाराला तर पुषाकुमाराने दोनही सलामीवीरांना तंबूत धाडले.
दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने २९ षटकांत ३ विकेट गमावून १०१ धावा केल्या. संपूर्ण मालिकेतील पहिल्या दिवसाच्या खेळातील श्रीलंकेचा सर्वात चांगले सत्र होते.
संक्षिप्त धावफलक:
केएल राहुल ८५, शिखर धवन १९९, केएल राहुल ८, पुषाकुमारा २/१९, संदकन १/४५