आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा स्तर सध्या उंचावला आहे. भारतीय संघाकडे आता एकपेक्षा एक युवा खेळाडूंचा भरणा आहे. आता भारतीय संघाचा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास चिंता वाटणार नाही कारण, भारतीय संघाने ‘बेंच स्ट्रेंथ’ मजबूत केली आहे. हेच कारण आहे की, भारतीय संघ आता एकाच वेळी दोन संघ वेगवेगळ्या देशांच्या मैदानात उतरवू शकतो. हो तुम्ही जे वाचलात ते खरे आहे. वरिष्ठ भारतीय संघ सध्या इंग्लंडला गेला असून तिकडे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर दुसरा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्याला जाणार असून कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडे देण्यात आली आहे.
येत्या २३ जून पासून दुसरा भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्याला जात असून भारतीय संघ या दौऱ्यावर ५ टी२० सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर जाणाऱ्या २० भारतीय खेळाडूंची नावे जाही झाली असून या संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे देण्यात आले आहेत. या संघात खूप नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे.
दरम्यान, धवनला कर्णधारपदा मिळाल्याची घोषणा होताच त्याने आता पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विटरवर फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल त्याने आभार मानले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणाला. ‘देशाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार.’
Humbled by the opportunity to lead my country 🇮🇳 Thank you for all your wishes 🙏 pic.twitter.com/SbywALBTwZ
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 11, 2021
डावखुरा सलामीवीर असलेल्या ३५ वर्षीय धवनकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. धवन भारताच्या एकदिवसीय आणि टी२० संघाचा नियमित सदस्य आहे. धवनकडे १४२ एकदिवसीय सामन्याचा अनुभव असून यात त्याने ५९७७ धावा केल्या आहेत आणि सोबत १९ षटकार ठोकले आहे. ह्या दौऱ्यामध्ये धवन कशी कर्णधाराची भूमिका बजावतो या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
या फायद्यासाठी सिराजऐवजी अंतिम सामन्यात शार्दुल ठाकूरला संधी द्या, माजी निवडकर्त्यांचा सल्ला
कोरोना इफेक्ट! डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिसने घेतली या मोठ्या लीगमधून माघार