---Advertisement---

धीरज फटांगरेच्या नावे MPL 2025 ची पहिली फिफ्टी, रत्नागिरीची मजल 194 पर्यंत

On: बुधवार, जून 4, 2025 9:39 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा उद्घाटन सोहळा बुधवारी ‌(4 जून) पार पडला. दिमागदार सोहळ्यानंतर हंगामातील पहिला सामना खेळला गेला. गतविजेते रत्नागिरी जेट्स व ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील या सामन्यात रत्नागिरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 194 धावा उभ्या केल्या. रत्नागिरीचा युवा सलामीवीर धीरज फटांगरे याने शानदार नाबाद अर्धशतक झळकावले.

हंगामातील पहिल्या सामन्यात नाशिकचा कर्णधार प्रशांत सोलंकी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मुकेश चौधरी याने योग्य ठरवत प्रीतम पाटील याला केवळ 12 धावांवर बाद केले. प्रीतमने चार चेंडूत दोन षटकार मारण्याची कामगिरी केली. त्यानंतर धीरज व कर्णधार अझीम काझी यांनी 75 धावांची भागीदारी करत, आपल्या संघाला सामन्यात परत आणले. अझीम 42 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर निखिल नाईक व दिव्यांग हिंगणेकर यांनी अनुक्रमे 14 व 20 धावांचे योगदान दिले.

एका बाजूने फलंदाज बाद होत असताना धीरज याने 35 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. हे स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठरले. डावातील 18 व्या षटकात मनोज इंगळे याच्यावर हल्ला चढवत किरण चोरमले व धीरज यांनी 19 धावा वसूल केल्या. मात्र, पुढील षटकातील पहिल्या दोन चेंडूवर मुकेश चौधरी याने किरण व साहिल चुरी यांना बाद केले. त्यानंतर धीरजने काही मोठे फटके मारत संघाला 194 पर्यंत पोहोचवले.

धीरज फटांगरे याने अखेरपर्यंत नाबाद 47 चेंडूवर 7 चौकार व षटकारांच्या मदतीने 81 धावा केल्या. तर, नाशिकसाठी अनुभवी मुकेश चौधरी याने 4 षटकात 43 धावा देऊन तीन बळी मिळवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---