दुबई। आज 14 व्या एशिया कपमधील सुपर फोरमध्ये भारताचा अफगाणिस्तानबरोबर सामना होत आहे. या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी भारताचे नेतृत्व करणार आहे.
त्याने जानेवारी 2017 मध्येच भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे भारताची धूरा सोपवली आहे. तसेच धोनीने 2014 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.
या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा उपकर्णधार शिखर धवनला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे नेतृत्वाची संधी माजी कर्णधार एमएस धोनीकडे चालुन आली.
कर्णधार म्हणुन धोनीचा हा २०० वा सामना आहे. यापुर्वी केवळ आॅस्ट्रेलियाचा रिकी पाॅटिंग आणि न्यूझीलंडच्या स्टिफन फ्लेमिंगने २०० किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यात नेतृत्व केले आहे.
आॅस्ट्रेलियाच्या रिकी पाॅटिंगने २३० सामन्यात नेतृत्व करताना १६५ विजय मिळवले आहे. तर स्टिफन फ्लेमिंगने २१८ सामन्यात ९८ विजय मिळवले.
धोनीने या सामन्याआधी १९९ वनडे सामन्याच नेतृत्व केले होते. यामध्ये त्याने ११० विजय, ७४ पराभव आणि ४ सामने बरोबरीचे तर ११ सामने हे अनिर्णित राहिले होते.
महत्वाच्या बातम्या –
–आणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल
–जर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….
–रोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित
–म्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल