---Advertisement---

हे पोरगं भारीय! सामना सुरू होण्याआधीच पंतने घेतली धोनीची मदत, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, एप्रिल 10, 2021 6:54 PM
---Advertisement---

जगातील सर्वात लोकप्रिय टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला शुक्रवारी (९ एप्रिल) रंगतदार सुरुवात झाली. त्यानंतर, आज(१० एप्रिल) दुसर्‍या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भिडतील. या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत हा सीएसकेमधील आपल्या राष्ट्रीय संघातील सहकाऱ्यांना भेटताना दिसला.

रिषभ भेटला धोनी आणि इतर सहकार्‍यांना
नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने प्रथमच दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भुषवणारा रिषभ पंत आगामी आयपीएलसाठी चांगलाच उत्सुक आहे. हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. तत्पूर्वी, या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रिषभ पंत चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तो सर्वप्रथम चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीसोबत खेळपट्टीविषयी बोलताना दिसतोय. त्यासोबत, तब्बल ७ वर्षानंतर आयपीएलमध्ये खेळणारा चेतेश्वर पुजारा याच्याशी देखील तो चर्चा करताना दिसला. मागील वर्षी वैयक्तिक कारणाने आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाशी पंत मजामस्ती करताना दिसून आला.

चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ-
ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसीस, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोईन अली, एमएस धोनी (यष्टीरक्षक व कर्णधार), के गौतम, ड्वेन ब्राव्हो, दिपक चहर, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर.

दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ-
पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, रिषभ पंत (यष्टीरक्षक व कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, टॉम करन, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, इशांत शर्मा, उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या –

दुखापतीमुळे आयपीएलमधून धरला घरचा रस्ता, आता भावुक होतं मुंबईकर अय्यरने दिल्लीकरांसाठी तयार केला खास व्हिडीओ

चेन्नई संघात ‘या’ खेळाडूचे पुनरागमन होत असल्याचे पाहून दिल्लीचा प्रशिक्षक पाँटिंग आला टेंशनमध्ये, म्हणाला…

‘बहुत मजा आयेगा आज!’ धोनी-पंतला आमने-सामने पाहण्यास टीम इंडियाचे गुरु सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---