पुणे। काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना पार पडला या सामन्यात मुंबईने चेन्नईवर ८ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने जरी या सामन्यात पराभव पत्करला असला तरी त्यांचा कर्णधार एमएस धोनीने एक खास विक्रम केला आहे.
हा सामना कॅप्टन कूल धोनीचा आयपीएलमधील कर्णधार म्हणून १५० वा सामना होता. आयपीएलमध्ये १५० सामन्यात नेतृत्व करणारा धोनी पहिलाच कर्णधार ठरला आहे.
त्याने आयपीएलच्या १० मोसमांपैकी ८ मोसमात चेन्नईच तर १ मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं नेतृत्व केल आहे. तसेच तो यावर्षीही २ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करत आहे.
याबरोबरच कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये सार्वधिक सामन्यात विजय मिळवण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्याने १५० आयपीएल सामन्यात नेतृत्व करताना ८८ सामन्यात विजय आणि ६१ सामन्यात पराभव मिळाले आहेत.
तसेच त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ६ वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर २ वेळा विजेतेपद मिळवले आहे.
काहीदिवसांपूर्वीच धोनीने कर्णधार म्हणून टी२०मध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारे कर्णधार:
एमएस धोनी – १५० सामने
गौतम गंभीर – १२९ सामने
विराट कोहली – ८८ सामने
रोहित शर्मा – ८२ सामने
अॅडम गिलख्रिस्ट – ७४ सामने
महत्त्वाच्या बातम्या –
–एकवेळ फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला तो गोलंदाज आज पाकिस्तान संघात जागा मिळण्यासाठी झगडतोय
–1998 च्या आयसीसी क्रमवारीतील टॉप टेन खेळाडू पाहून थक्क व्हाल
–महाराष्ट्राची स्म्रिती मानधना आशिया कपसाठी भारताची उपकर्णधार तर मुंबईकर जेमिमाचाही संघात समावेश
–मोहम्मद शमीची जन्मतारीख नक्की काय? १९८२ की १९९०?
–दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळला नेहरा, आता होणार या राज्यात स्थायिक