मागच्या काही मिहन्यांपासून एमएस धोनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. धोनी भारतीय संघासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक महान कर्णधार आहे. क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम करणाऱ्या धोनीला चाहते एका नवीन भुमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. काही महिन्यांपूर्वी धोनीने त्याचे फिल्म प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. आता धोनीच्या याच प्रोडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली गेली आहे.
एमएस धोनी (Ms Dhoni) याच्या फिल्म प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘धोनी एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड’ (Dhoni Entertainment Private Limited’s) असे आहे. धोनीच्या या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत पहिला सिनेमा तयार होत आहे. या सिमानेच नाव ‘एलजीएम’ (LGM) म्हणजेच ‘लेट्स गेट मॅरिड’ असे आहे. शुक्रवारी (27 जानेवारी) या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले गेले. प्रोडक्शन हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा मोशन पोस्टर रिलीज गेला गेला आहे. हा एक तमिळ चित्रपट असून हरिश कल्याण (Harish Kalyan) प्रमुख भुमिकेत असेल. तसेच इवाना प्रमुख अभिनेत्री म्हणून काण करणार आहे. चित्रपटात नादिया आणि योगी बाबू यांची पात्रेही दिसणार आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शन रमेश थमिलमी यांना सोपवले गेले आहे.
मागच्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये धोनीच्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा झाली. त्यावेळी अशीही माहिती दिली गेली होती की, प्रोडक्शन हाऊसचा पहिला सिनेमा तिमिळ असेल. प्रोक्शन हाऊसचे सर्व कामकाच धोनीची पत्नी साक्षी सांभाळत आहे. धोनी एंटरटेनमेंटच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश थमिलमी याविषयी म्हणाले की, “या चित्रपटाची संकल्पना साक्षीची आहे, जी खूपच खास आहे आणि मला देखील खूप आवडली. हा एक परिपूर्ण कौटुंबीक मनोरंजनसाठी बनवला जाणारा चित्रपट आहे.”
We're super excited to share, Dhoni Entertainment's first production titled #LGM – #LetsGetMarried!
Title look motion poster out now! @msdhoni @SaakshiSRawat @iamharishkalyan @i__ivana_ @HasijaVikas @Ramesharchi @o_viswajith @PradeepERagav pic.twitter.com/uG43T0dIfl
— Dhoni Entertainment Pvt Ltd (@DhoniLtd) January 27, 2023
भारतासाठी सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकणारा कर्णधार –
दरम्यान, एमएस धोनी भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. आयसीसीचा पहिला टी-20 विश्वचषक 2007 साली खेलला गेला होता. निवडकर्त्यांनी या स्पर्धेसाठी धोनीच्या नेतृत्वातील युवा संघ निवडला आणि कर्णधाराने विजेतेपद पटकवत सर्वांनाच अश्चर्यचकीत केले. त्यानंतर भारताने धोनीच्याच नेतृत्वात 2011 साली वनडे विश्वचषक जिंकला. 2013 साली धोनीच्याच नेतृत्वातील भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला होता. 2019 साली खेलल्या गेलेल्या वनडे विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कारकिर्दीत त्याने एकूण 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. (Dhoni Entertainment Private Limited’s first movie is coming soon)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे आहेत आयसीसी पुरस्कार 2022 चे मानकरी, वाचा संपूर्ण यादी एकाच क्लिकवर
कारकिर्दीतील शेवटचे ग्रँडस्लॅम नाही जिंकू शकली सानिया मिर्झा, पराभवानंतर अश्रू अनावर






