---Advertisement---

फॅन हूँ मैं! चाहत्याने चक्क सगळं घरच केलंय ‘धोनीमय’

On: बुधवार, ऑक्टोबर 14, 2020 1:37 PM
---Advertisement---

आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघ देशातील लोकप्रिय संघांपैकी एक आहे. तसेच या संघाचा कर्णधार एमएस धोनीचेही चाहते जगभरात पाहायला मिळतात. हे चाहते वेगवेगळ्या गोष्टी करुन त्यांचे धोनी प्रती आणि चेन्नई संघाप्रती प्रेम व्यक्त करत असतात. याचेच एक उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले आहे. एका चेन्नई सुपर किंग्सच्या आणि धोनीच्या चाहत्याने त्याच्या संपूर्ण घरालाच जणू धोनीमय केले आहे. त्याने त्याच्या घराचे नावही धोनीवरुनच दिले आहे.

याबद्दल चेन्नई सुपर किंग्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फोटो शेअर करुन माहिती दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसते की चाहत्याने त्याचे संपूर्ण घर पिवळ्या रंगात रंगवले आहे, जो की चेन्नई संघाच्या जर्सीचा रंग आहे. त्यावर त्याने धोनीचे आणि चेन्नई सुपर किंग्स संघाच्या लोगोचे चित्रही काढले आहे. तसेच त्याच्या घरावर ‘होम ऑफ धोनी फॅन’ असे नाव लिहिलेले दिसते.

ज्या चाहत्याचे हे घर आहे त्याचे नाव गोपी कृष्णन आहे. फोटो शेअर करताना चेन्नई सुपर किंग्सने कॅप्शनमध्ये या चाहत्याची माहिती दिली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘अरंगूर, तमिळनाडू येथील सुपर फॅन गोपी कृष्णन आणि त्याच्या कुटुंबाने त्यांच्या घराचे नाव ‘होम ऑफ धोनी फॅन’ असे नाव दिले आहे. त्याने केलेल्या या खास गोष्टीने आमचे मन भरुन आले आहे.’

https://twitter.com/ChennaiIPL/status/1315955697201233922

३ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सची यंदाच्या हंगामात खास कामगिरी झालेली नाही. त्यांनी आत्तापर्यंत ८ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या ते गुणतालिकेत ६ व्या क्रमांकावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL 2020: आज दिल्ली-राजस्थान येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

फिरकीने भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या राशिदविरुद्ध धावा करायच्यात ना? सेहवागच्या ‘या’ टिप्स ऐका

वाह क्या बात है! धोनीचा अवघड झेल घेण्यात अपयशी ठरल्यानंतरही होतेयं संदीपचं कौतुक, पाहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार

IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत

स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---