ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये सीएसकेचा कर्णधार आहे. एमएस धोनी यावर्षी आयपीएलमध्ये ऋतुराजच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. धोनीच्या चाहत्यांसाठी गुरुवारी (21 मार्च) ही घोषणा धक्कादायक होती. पण संघाच्या भविष्याचा विचार करून घेतला गेलेला हा निर्णय आहे. चाहत्यांसाठी हा अचानक मिळालेला धक्का ठरत असला तरी, ऋतुराजला आधीपासून याविषयीचे संकेत धोनीकडून मिळाले होते.
एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनला. धोनीने सीएसकेला 5 आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्या. पण आयपीएल 2024 मध्ये सीएसके धोनीऐवजी ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याच्या नेतृत्वात खेळमार आहे. धोनीने याआधी 2022 मध्येही सीएसकेचे नेतृत्व सोडले होते. पण त्यावेळी रविंद्र जडेजा याला कर्णधारपदाचा भार पेलता आला नाही आणि धोनीने पुन्हा कर्णधारपद स्वीकारले. मागच्या संपूर्ण हंगामात सीएसकेचा कर्णधार धोनी होता आणि त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिले. असे असले तरी धोनीने मागच्या हंगामात संघाचा नवा कर्णधार जवळपास निश्चित केला होता. त्याने कर्णधारपदाविषयीचे संकेत ऋतुराजला दिले होते.
सीएसकेचा कर्णधार बनल्यानंतर ऋतुराजने धोनीकडून मागच्या वर्षी मिळालेल्या संकेतांविषयी माहिती दिली. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडियावर ऋतुराजचा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओत ऋतुराज गायकवाड म्हणतो की, “मला नाही वाटत की मला काही बदल करण्याची सरज आहे. मागच्याच वर्षी मला धोनीकडून कर्णधारपदाचे संकेत मिळाले होते. तो म्हणाला होता की, तयार राहा, तुझ्यासाठी ही (कर्णधार) आश्चर्याची गोष्ट नसली पाहिजे.”
.@ChennaiIPL fans, meet your new Captain! 😎
The newly appointed #CSK skipper, Ruturaj Gaikwad, shares what this new opportunity means to him 💛 – By @RajalArora#TATAIPL | #CSKvRCB pic.twitter.com/PS1qfGH2n9
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
दरम्यान, सीएसकेसह मुंबई इंडियन्स संघालाही कर्णधार मिळाले आहेत. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी रोहित शर्मा याच्या जागी हार्दिक पंड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. तसेच राजस्थान रॉयल्ससाठी कर्णधार रिषभ पंत मैदानात पुनरागमन करत आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल 2024 मध्ये नवजोत सिंह सिद्धूची शायरीसोबत धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO
आयपीएलच्या 17 व्या हंगामात होणार दमदार उद्घाटन सोहळा, रंगारंग कार्यक्रमात कोण लावणार हजेरी?