सोमवारी (१ ऑगस्ट) महिला लॉन बॉल संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी इतिहास रचला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात तिने बलाढ्य न्यूझीलंडचा १६-१३ असा पराभव करून प्रथमच अंतिम फेरी गाठली. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी टिर्की यांच्या भारतीय चौकडीने अप्रतिम कामगिरी केली. मात्र, या सामना विजयामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा मोलाचा वाटा असल्याचे खुद्द संघातील खेळालाडूने सांगितले आहे. सामना जिंकल्यानंतर लवली चौबेने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केला आहे.
लवलीने सांगितले की, “बर्मिंघममध्ये प्रशिक्षणादरम्यान धोनी महिला लॉन बॉल टीमला दोनदा भेटला होता. “एमएस धोनी सर दोनदा आमच्या प्रशिक्षण क्षेत्रात आम्हाला भेटायला आले आहेत. त्यांना लॉन बॉलबद्दल बरेच काही माहित आहे”. क्रिकेटशिवाय धोनी इतर खेळांबाबतही जागरूक आहे. त्याला अनेकदा फुटबॉल खेळताना दिसले आहे. धोनी नुकताच इंग्लंडमध्ये होता. तो नुकताच भारतात परतला आहे.
लॉन बॉलमध्ये भारताचे पहिले पदक निश्चित झाले
लॉन बॉलमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवता आले आहे. भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत नॉरफोक आइसलँडचा पराभव केला. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. आफ्रिकन संघाने फिजीचा १६-१४ असा पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
न्यूझीलंडचा लॉन बॉलमधील इतिहास मोठा
भारताने न्यूझीलंडला हरवून मोठा धक्का दिला आहे, कारण या खेळात किवी संघाची ४० पदके आहेत. ते जगातील सर्वोत्तम पाच लॉन बॉल संघांपैकी एक आहेत. सामन्यात भारतीय चौकडी एका वेळी ०-५ ने पिछाडीवर होती. असे असतानाही संघाने बाऊंस बॅक करत ७-६ अशी आघाडी घेतली. नंतर ही आघाडी १०-७ अशी वाढली. येथून भारतीय संघाने मागे वळून पाहिले नाही. त्याने सातत्यपूर्ण गोल करत न्यूझीलंडचा पराभव केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टी२० विश्वचषकासाठी खतरनाक योजना आखतायत भारताचे प्रशिक्षक, गोलंदाजांची बनवतायत फौज
तब्बल १७ वर्षांनंतर ‘हा’ विश्वविजेता संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी सज्ज, पीसीबीने जाहीर केलं वेळापत्रक
विराट कोहली परतल्यानंतर ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी, माजी दिग्गजाने स्पष्ट केले कारण