भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या आपल्या कुटूंबासह रांची येथे राहतो. रांची येथे धोनीचे आलिशान फार्म हाऊस आहे. धोनीची पत्नी साक्षी धोनी ही आपल्या इंस्टाग्रामवर सतत कोणते ना कोणते फोटो शेअर करत असते. यावेळी मात्र तिने धोनीच्या चाहत्यांना नवीन घराची झलक दाखविली आहे. धोनीच्या नवीन घराचे फोटो पाहून त्याचे चाहते विशेषतः मुंबईमधील चाहते चांगलेच सुखावले आहेत.
धोनी आणि साक्षी मुंबईत नवीन घर बांधत आहेत, ज्याचे काम अतिशय वेगाने सुरु आहे. नवीन घराच्या सुरू असलेल्या कामाचे फोटो शेअर करताना साक्षीने त्याखाली ‘न्यू होम’ असे लिहिले आहे. आर्किटेक्ट डिझायनर शंतनू गर्ग हे धोनी आणि साक्षीच्या या नवीन घराची संरचना करत आहेत. या घराचे फोटो शेअर करताना त्यानेही असे लिहिले की, “माझ्या स्वप्नांची शेवटची कलाकारी.” यात साक्षी धोनी आणि धोनीलाही त्याने टॅग केले आहे.
https://twitter.com/Mr_unknown23_/status/1325427331905679360
साक्षी आणि धोनीच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2010 साली त्या दोघांचे लग्न झाले होते. त्यावेळेस धोनी हा भारतीय संघाचा कर्णधार होता. 2015 साली मुलगी ‘जीवा’ त्यांच्या आयुष्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय





