भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने तो पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अनुपलब्ध राहणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले आहे.
भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल असलेला धोनी या रेजिंमेंटबरोबर पुढिल 2 महिने वेळ घालवणार असल्याचे वृत्त आले आहे.
याबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकारीने पीटीआयला सांगितले आहे की ‘धोनीने तो वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अनुपलब्ध असल्याचे सांगितले आहे. तो पुढील 2 महिने पॅरामिलिट्री रेजिमेंटमध्ये वेळ घालवणार आहे.’
रविवारी(21 जूलै) वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. त्याआधी धोनीने बीसीसीआयला त्याच्या अनुपलब्धतेबद्दल कळवले आहे.
त्यामुळे आता या वेस्ट इंडिज दौऱ्यातील क्रिकेटच्या तीन्ही प्रकारासाठी भारतीय संघात रिषभ पंत हा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पहिली पसंती असण्याची शक्यता आहे. तसेच वृद्धीमान सहा देखील कसोटी संघात पूनरागमन करण्याची शक्यता आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विंडीज दौऱ्यासाठी या दिवशी होणार टीम इंडियाची निवड
–मुलाखत: प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये नवा नवीन बघायला मिळेल- नवीन कुमार
–टॉप ७: भारताचे हे क्रिकेटपटू आहेत उच्चशिक्षित