---Advertisement---

पुणेकर चाहत्यांची होऊ शकते निराशा, हा खेळाडू उद्याच्या सामन्यात खेळणार नाही

On: गुरूवार, एप्रिल 19, 2018 8:10 PM
---Advertisement---

पुणे | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान राॅयल्स सामन्याला कर्णधार एमएस धोनीला मुकावे लागू शकते. धोनीच्या पाठीला दुखापत झाल्यामूळे तो उद्याच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. 

धोनीने आज गहूंजे येथे एमसीएच्या स्टेडियमवर सरावातही भाग घेतला नाही. यावेळी संपुर्ण संघ सरावासाठी मैदानात उतरला होता परंतू धोनी यावेळी सरवाला आला नाही. 

गेल्या सामन्यात प्रथमच संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाने मात्र सराव केला. तोही उद्याच्या सामन्यात खेळणार नाही असे आधीच सांगण्यात आले होते परंतू त्याला आज सराव करताना पाहून तो उद्या संघाच नेतृत्व करेल असे वृत्त आहे. 

याबाबत कोणतीही अधिकृत माहिती संघव्यवस्थापनाकडून देण्यात आली नाही. 

गेल्या आठवड्यात किंग्ज इलेव्हनविरुद्ध धोनीने अर्धशतकी खेळी केली होती. त्याच सामन्यात त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोकेवर काढले होते. 

जर हा दिग्गज उद्या खेळला नाही तर चेन्नईवरून खास ट्रेनने येणाऱ्या चाहत्यांची मात्र चांगलीच निराशा होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment