---Advertisement---

फक्त 19 धावा आणि सुरेश रैनाचा विक्रम मोडत धोनी रचणार का नवा इतिहास ?

On: शनिवार, मार्च 22, 2025 3:57 PM
MS Dhoni Ruresh Raina
---Advertisement---

आज पासून आयपीएल 2025 स्पर्धा सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना आरसीबी विरुद्ध केकेआर संघांमध्ये खेळला जाणार आहे. 5 वेळा आयपीएल विजेता असलेला संघ चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2025 मध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी तयार आहे. सीएसके संघ स्पर्धेमध्ये त्यांची सुरुवात 23 मार्चपासून करणार आहे. जिथे त्यांचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा धोनीवर असणार आहेत. धोनीला नवा इतिहास रचण्यासाठी फक्त 19 धावांची गरज आहे. जर त्याने 19 धावा केल्या तर तो सुरेश रैनाचा मोठा विक्रम उध्वस्त करू शकतो.

एम. एस.धोनी वयाच्या 43 व्या वर्षी इतिहास रचण्यासाठी तयार आहे तो चेन्नई संघातील सर्वात यशस्वी फलंदाज बनण्यासाठी फक्त 19 धावा दूर आहे. आत्ताच्या घडीत सीएसकेसाठी सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज सुरेश रैना आहे. त्याने आयपीएल करिअरमध्ये 4687 धावा केल्या आहेत. तसेच दुसऱ्या स्थानावर धोनी आहे, ज्याच्या नावावर 4669 धावा आहेत. त्यामुळेच जर धोनी अजून 19 धावा करू शकला तर तो सीएसकेसाठी सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज बनू शकतो. धोनीने चेन्नईसाठी आतापर्यंत 22 अर्धशतक केली आहेत. उद्या होणाऱ्या मुंबई विरुद्ध सामन्यांमध्ये जर त्याने 19 धावा केल्या तर तो मोठा विक्रम त्याच्या नावावर करू शकतो.

वयाच्या 43 व्या वर्षी स्वतःला फिट ठेवून चेन्नई सारख्या मोठ्या संघामध्ये प्रतिनिधित्व करणे सोपे काम नाही. तसेच या वयामध्ये धोनी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघासाठी शानदार प्रदर्शन करत आला आहे. त्याचं करियर पाहिलं तर त्याने आत्तापर्यंत 264 आयपीएल सामन्यांमध्ये 39.12 च्या सरासरीने 5243 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 24 अर्धशतक केली आहेत, तसेच धोनीने मागच्या हंगामात सुद्धा चेन्नईसाठी चांगली खेळी केली होती. त्याने 53.66 च्या शानदार सरासरीने 14 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 161 धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये चेन्नईसाठी सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज
सुरेश रैना- 4687
महेंद्र सिंह धोनी- 4669
फॉफ डु प्लेसिस- 2721

ऋतूराज गायकवाड़- 2380
अंबाती रायडू- 1932

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---