---Advertisement---

हिंदी-इंग्रजी नाही, धोनीला आवडते या भाषेतील कॉमेंट्री

nadal (36)-1724234922354-1724484337509-1725178405736
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. तत्पूर्वी भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्र सिंग धोनीने क्रिकेटच्या कॉमेन्ट्री भाषेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भोजपुरी कॉमेन्ट्रीचे कौतुक केले आहे. तसेच भोजपुरी कॉमेन्ट्री अधिक प्रभावी वाटते असेही तो म्हणाला. पुढे तो म्हणाला की मला भोजपुरी कॉमेन्ट्री जुन्या काळातील रेडिओ कॉमेन्ट्रीची आठवण करून देते. भोजपुरीने आयपीएल 2023 च्या दरम्यान कॉमेन्ट्री त्या भाषेत करणे सुरू केले आहे.

आयपीएल स्पर्धेचा 18 वा हंगाम सुरु झाला आहे. यामध्ये 16 वेगवेगळ्या माध्यमाद्वारे लाइव्ह प्रसारण केले जाते. तसेच यामध्ये 12 भाषांमधून कॉमेन्ट्री केली जात आहे. इंग्लिश, मराठी, हरियाणवी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, गुजराती आणि पंजाबी या भाषांचा समावेश आहे.

धोनी म्हणाला की, मी क्षेत्रीय भाषेतील जास्त कॉमेन्ट्री ऐकली नाही. जेव्हा हायलाइट्सच्या माध्यमातून पुनर्प्रसारण केले जाते तेव्हा, अधिक प्रमाणात मी कॉमेन्ट्री हिंदी किंवा इंग्रजी भाषेत ऐकतो. यामुळे आपल्याला खेळ समजण्यास मदत होते. तसेच मला कॉमेंटेटर यांच्या गप्पा ऐकायला देखील खूप आवडते, कारण त्यांच्यामध्ये जास्त तर माजी खेळाडूच असतात. मी एका हंगामात 17 सामने खेळू शकतो पण ते वेगवेगळ्या देशातील शेकडो सामन्यांत कॉमेन्ट्री करत असतात.

खेळाडू असल्याच्या नात्याने आम्ही आमच्या संघाची ताकद आणि कमजोरी ओळखतो. पण कॉमेन्ट्री ऐकून तुम्हाला एका खेळाडूची चांगली जाण होते.

धोनी सध्या 2025 मध्ये त्याचा आयपीएल स्पर्धेचा 18 वा हंगाम खेळत आहे. त्याने आतापर्यंत 265 सामने खेळले आहेत आणि यामध्ये 24 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 5,243 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---