---Advertisement---

राधिकाला मिठी मारली, अनंत अंबानीला सल्ला दिला; नव्या जोडप्यासाठी ‘माही’ची खास पोस्ट

On: सोमवार, जुलै 15, 2024 3:31 PM
ms dhoni, anant-radhika wedding
---Advertisement---

MS Dhoni Post For Anant & Radhika Ambani :- आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे मालक आणि प्रसिद्ध भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. त्यानंतर शनिवारी (13 जुलै) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नवदाम्पत्याचा शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रिकेटजगतातील अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी याने राधिका आणि अनंतसाठी खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

धोनी कुटुंबासह राधिका आणि अनंत अंबानीच्या सर्व प्री-वेडिंग सोहळ्यांना उपस्थित होता. विवाहसोहळ्यातही त्याने आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. लग्न समारंभ पार पडल्यानंतर धोनी आणि साक्षीने अनंत व राधिकाची भेट घेऊन दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

धोनीने इंस्टाग्रामवर राधिका आणि अनंतसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धोनीने एक फोटो जोडला आहे, ज्यात राधिकाने धोनीला मिठी मारल्याचे दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये धोनीने अनंतला राधिका काळजी घे, असा मोलाचा सल्ला दिला आहे. धोनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “राधिका, तुझे तेजस्वी स्मित कधीही मावळू नको दे! अनंत कृपया राधिकाची काळजी घेत राहा जे तू तुझ्या सभोवतालच्या सर्वांप्रती दाखवतोस. तुझे वैवाहिक जीवन आनंदाने, हास्याने भरले जावो आणि अभिनंदन आणि लवकरच भेटूया हे गाणे वीरेन अंकलसाठी आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

दरम्यान धोनीव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूही राधिका आणि अनंत अंबानींच्या विवाहसोहळ्यात दिसले. माजी भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकर त्याची पत्नी अंजली तेंडूलकर आणि मुलगी सारा तेंडूलकरसह नव्या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आला होता. तसेच भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही पत्नीसोबत दिसला होता. याशिवाय हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या, इशान किशन, युझवेंद्र चहल, केएल राहुल हेदेखील विवाह समारंभाचा आनंद लुटताना दिसले.

महत्वाच्या बातम्या-

‘हिटमॅन’च्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी! टी20 नंतर रोहित वनडे आणि कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होणार?

आयपीएलमध्ये आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला कांगारुंनी दिलं संघात स्थान

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---