भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी सध्या पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत शिमलामध्ये सुट्टीसाठी गेला आहे. याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वापर्यंत पोहोचली आहे. तो जरी सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसला, तरीही धोनीच्या चाहत्यांना त्याची मुलगी आणि पत्नीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याचे दर्शन घडत असते. (A photo of former India captain Mahendra Singh Dhoni and his daughter Jiva talking has gone viral)
धोनीची पत्नी साक्षी ही त्याचे व्हिडिओ आणि फोटो सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच धोनीचा घोड्यासोबतचा शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता, तर सध्या धोनी आपली मुलगी झिवासोबत वेळ घालवत असतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
https://www.instagram.com/p/CQa9DminfF0/?utm_source=ig_web_copy_link
झिवाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पुन्हा एकदा चाहत्यांसाठी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एमएस धोनी आपल्या मुलीसोबत दिसत आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये धोनी आणि मुलगी झिवा एकमेकांसोबत बोलताना दिसत आहेत. यासोबतच झिवाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून डोंगरांमध्ये आनंद घेत असल्याचे अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत.
https://www.instagram.com/p/CQYrUI3HGQs/?utm_source=ig_web_copy_link
धोनी हा इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या सुरुवातीला शेवटचा मैदानावर दिसला होता. परंतु कोरोनाच्या बायोबबलमध्ये झालेल्या शिरकावामुळे आयपीएलच्या चौदाव्या हंगामास 29 सामन्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. आयपीएलच्या या हंगामाला स्थगिती मिळण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघ 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवत गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. आयपीएल 14 व्या हंगामाचे उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयोजित केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन ठरला २१ व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज; ‘या’ दिग्गजाला मागे टाकत पटकावला मान
…अन् चाहत्यांचे सेलिब्रेशन क्षणात बदलले निराशेत, पाहा कॅमेरामनने टिपलेला भन्नाट व्हिडिओ






