---Advertisement---

‘कॅप्टनकूल’ धोनी झालाय दुकानदार, रांची शहरात थाटलंय ‘या’ गोष्टीच दुकान

On: मंगळवार, मार्च 23, 2021 7:57 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या आयपीएल २०२१ च्या तयारीत व्यस्त आहे. ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी तो दोन आठवड्यांपूर्वी चेन्नईत दाखल झाला असून, सर्व युवा भारतीय खेळाडूंसोबत सराव करताना दिसतोय. मात्र दुसरीकडे धोनीचे घर असलेल्या रांचीमध्ये त्याचा नवा व्यवसायदेखील अतिशय वेगाने सुरू झाला आहे.

या गोष्टीचे खोलले रिटेल काउंटर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वेळ काढत धोनीने शेती करण्यास सुरुवात केली होती. काहीतरी हटके म्हणून त्याने सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केलेला. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात तो जातीने शेतीवर लक्ष देत होता. त्याने आपल्या शेतामध्ये विविध फळभाज्यांची लागवड केलेली. काही दिवसांपूर्वी त्याने त्याची विक्री करण्यास देखील सुरुवात केली.

धोनीच्या शेतात पिकलेल्या मालाला चांगली मागणी वाढल्याने धोनीने आपल्या उत्पादनाचे ‘रिटेल काऊंटर’ सुरु केले. या रिटेल काऊंटरवर फळे, भाजी व दुधाची विक्री होत असून, चाहत्यांचा त्याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

या गोष्टींची झाली विक्री
रिटेल काउंटर सुरू केल्यावर पहिल्या दिवशी स्ट्रॉबेरी, तुती, पपई, दूध आणि तूप यासारखी उत्पादने त्वरित विकली गेली. हिरव्या भाज्या तसेच मटार, बाण, सोयाबीन, भोपळा आणि ढोबळी मिरची या फळभाज्या विकल्या गेल्या. धोनीच्या डेअरी फार्ममधील दूध व तूपदेखील हातोहात विकले गेले. धोनी तब्बल ४३ एकर इतक्या जागेमध्ये सेंद्रिय शेती व डेअरी व्यवसाय चालवत आहे.

चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया
धोनीच्या उत्पादनांचे रिटेल काउंटर सुरू झाले आहे, हे समजल्यानंतर रांचीकरांची तिथे झुंबड उडाली. तिथे आलेल्या एका ग्राहकांने म्हटले, “धोनी ज्या क्षेत्रात जातो त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतो. या नव्या क्षेत्रात देखील तो पूर्वीसारखीच मजल मारेल.”

अन्य एका ग्राहकाने धोनीला मिळालेल्या पशुपालन पुरस्काराविषयी म्हटले, “पशुपालक म्हणून त्याने जे यश मिळवले, तसेच यश तो इथेदेखील मिळवेल.” धोनीचा जुना मित्र व त्याला पहिला प्रायोजक मिळवून देणारा परमजीत सिंग सध्या या नव्या व्यवसायाचे संचालन करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटसाठी काय पण! दुखापत झाली असतानाही पायावर पट्टी बांधून सचिनने खेळली फायनल

INDvENG: पुण्याच्या मैदानावर नाणेफेकीचा किती परिणाम? जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी आणि वातावरण

चौथ्या क्रमांकावर कोणत्या मुंबईकरांची लागणार वर्णी? प्रश्न अजूनही अनुत्तरित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---