इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. चेन्नईने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत या सामन्यात विजय मिळवला. यासोबतच अंतिम फेरीतील त्यांची जागा नक्की झाली. असे असले तरी चेन्नईच्या या विजयाला वादाची काळी किनार लाभली आहे.
थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ आतुर होते. मात्र, चेन्नईने आधी फलंदाजी व नंतर गोलंदाजीत सरस खेळ दाखवला. मात्र, सोळावे षटक सुरू होण्यापूर्वी मैदानावर बराच काळ खेळ थांबलेला दिसला. चार मिनिटांपेक्षा जास्त काळ खेळ थांबल्याने अनेक जण चकित झाले होते. मात्र, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने हुशारीने व नियमांचा फायदा उठवत आपल्या संघाला फायदा करून दिला.
डावातील हे महत्त्वाचे षटक मथिशा पथिराना याने टाकावे अशी धोनीची इच्छा होती. मात्र, पंचांनी त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखले. त्यामुळे बराच वेळ खेळ थांबला. जवळपास चार मिनिटांच्या या कालावधीत धोनी तसेच चेन्नईच्या इतर खेळाडूंनी दोन्ही पंचांशी चर्चा केली.
हा खेळ थांबण्याचे कारण होते पथिराना हा एक षटक बाहेर गेला होता. क्रिकेटच्या नियमानुसार एखादा गोलंदाज जितका वेळ बाहेर असतो, तितका वेळ त्याने मैदानात घालवल्यानंतरच त्याला गोलंदाजी करता येते. पथिरानाने 15 व्या षटकात विश्रांती घेतली होती. त्यामुळे त्याला थेट सतराव्या षटकात गोलंदाजी करता आली असती. मात्र, धोनीने नियमाचा फायदा उचलत चार मिनिटे पंचांशी चर्चा करून तो वेळ भरून काढला. त्यामुळे पथिराना त्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी पात्र ठरला.
अनेकांनी धोनीच्या या निर्णयाला मास्टर स्ट्रोक म्हटले तर काहींनी टीका केली आहे. मात्र, त्यावेळी तसे झाले नसते तर, पथिराना आपला स्पेल समाप्त करू शकला नसता.
(Dhoni Use Cricket Rule And Stops Game When Patheerana Bowling In Qualifier 1 Against Gujarat Titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला रैनासारखे योगदान द्यायचेय”, सीएसकेचा ‘राजकुमार’ ऋतुराजची प्रांजळ कबुली
शेवटी सीएसकेनेच करून दाखवलं! दोन वर्षात पहिल्यांदा गुजरातवर ओढवली ‘ही’ नामुष्की