भारतीय संघाने गुरुवारी विंडीज विरुद्ध 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-1 असा विजय मिळवल्यानंतर हे दोन संघ आता टी-20 मालिकेसाठी सज्ज आहे.
4 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांसाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला भारतीय संघातून वगळल्याने तसेच त्याची वनडेत कामगिरी खराब झाल्याने चांगलीच चर्चा सुरू आहे. धोनीच्या जागी रिषभ पंतला भारताच्या टी20 संघात घेतले आहे.
तसेच विंडीजप्रमाणेच धोनीला 21 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 मालिकेतही भारतीय संघात जागा मिळाली नाही. पण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने धोनी हा भारताच्या वनडे संघाचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
तसेच रिषभ पंतला संधी देण्यासाठी विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत धोनीचा समावेश नसेल, असेही विराटने सांगितले आहे.
विराट म्हणाला, “धोनी हा वनडे संघाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याला वाटले की टी20 क्रिकेट प्रकारात रिषभ पंत सारख्या खेळाडूला आणखी संधी मिळायला हवी.”
“तो (धोनी) भारतासाठी नियमित वनडे सामने खेळेल. त्यामुळे त्यादृष्टीने विचार केला तर तो फक्त युवा खेळाडूंना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. बाकीचे लोक जो विचार करत आहेत, तसे काही नाही. कर्णधार म्हणून मी तूम्हाला तशी खात्री देतो.”
"He's still a very integral part of this team."
India captain Virat Kohli has thrown his full weight behind former captain MS Dhoni's place in the ODI side. Agree with what he has to say?
READ ⬇https://t.co/ZxjjtI9JWB pic.twitter.com/N5g2X8LQur
— ICC (@ICC) November 2, 2018
गुरुवारी भारताने विंडीज विरुद्ध पाचव्या वनडे सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवला. या संपूर्ण मालिकेत रोहित शर्मा आणि विराट व्यतिरिक्त अंबाती रायडूलाही चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना पहायला मिळाले. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर नवोदित गोलंदाज खलील अहमदनेही चांगला खेळ केला.
त्यांच्याबद्दल बोलताना विराट म्हणाला, “बराच काळापासून आम्ही असे खेळाडू शोधत होतो. जो जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांना बॅकअप असेल आणि जो विकेट्सही काढेल, योग्य जागेवर गोलंदाजीही करेल. डावखुरी वेगवान गोलंदाज असण्याने गोलंदाजीमध्ये विविधता येते. खलील नक्कीच चांगला आहे.”
‘रायडूने संधीचा चांगला फायदा घेतला. त्याने परिपक्व फलंदाजी केली. तसेच त्याची फलंदाजी संमिश्र होती. तूम्ही शोधत असलेल्या जागेवर चांगली कामगिरी करणे चांगले आहे.’
याबरोबरच विराटने क्षेत्ररक्षणात अजून सुधारणा कराव्या लागतील असेही मत मांडले आहे.
असा आहे 4 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा(कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शहाबाज नदीम.
असा आहे 21 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या:
–विंडीजविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया
–सव्वादोन तासात भारतीय गोलंदाजांनी असा काही कारनामा केला की कुणी विचारही केला नसेल