---Advertisement---

धोनीविना कुलदीप पडतोय फिका! झिम्बाब्वेविरुद्ध रिकामा हात परतल्याने माजी क्रिकेटरला झाली आठवण

Kuldeep-Yadav-Dhoni
---Advertisement---

झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला वनडे सामना भारतीय संघाने १० विकेट्सने जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघ ४०.३ षटकातच १८९ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.५ षटकात झिम्बाब्वेचे लक्ष्य गाठले आणि सामना खिशात घातला. अशाप्रकारे हा सामना जिंकत भारताने १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताकडून गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले.

परंतु फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला मात्र एकही विकेट मिळाली नाही. आता माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण सिवारामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan)यांनी कुलदीपचा बचाव केला आहे. 

कुलदीपवर होता दबाव
कुलदीपने या सामन्यात सर्वाधिक १० षटके फेकली. या षटकांमध्ये त्याने ३६ धावा खर्च केल्या. परंतु त्याला एकही विकेट मिळाली नाही. तरीही कुलदीपला पाठिंबा देताना सिवारामाकृष्णन म्हणाले, “तो (कुलदीप) पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने खूप बचावात्मक खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण त्याला तिनही वनडे सामने खेळायचे आहेत. त्याने खूप सावधानीने गोलंदाजी केली. पण मी अपेक्षा करत आहे की, त्याने एकाच लाइनमध्ये गोलंदाजी करावी. मग त्याने गुगली टाको अथवा लेग ब्रेक गोलंदाजी करो. यामुळे फलंदाज त्रासतात”. 

धोनी करत असायचा कुलदीपची मदत
कुलदीपने बऱ्याचदा धोनीला (MS Dhoni) आपल्या शानदार प्रदर्शनाचे श्रेय दिले आहे. धोनी यष्टीमागून त्याची मदत करत असायचा, असे कुलदीपने बऱ्याचदा म्हटले आहे. यावरून सिवारामकृष्णनने धोनीचे कौतुक केले. ते म्हणाले की, “धोनी खूप चपळ होता. एक चांगला यष्टीरक्षक खूप अंतर निर्माण करतो. जर कोणता फलंदाज बॅकफूटवर खेळत असेल, तर यष्टीरक्षक गोलंदाजाला फुल लेंथ चेंडू टाकायला लावतो. धोनी असे सल्ले देण्यासाठी एकदम योग्य खेळाडू होता. तो फलंदाजांना बरोबर ओळखायचा. त्यानुसारच तो गोलंदाजाला सल्ले देत असे. तो चहल आणि कुलदीपला अगदी योग्य सल्ला देत असे.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

फलंदाजांना गुडघे टेकायला लावणारा अख्तर वापरतोय ‘कुबड्या’, वाचा कशामुळे आली ही वेळ

झिम्बाब्वेच्या गोपिकांना भारताच्या कन्हैयाची भुरळ! चाहरचा महिला चाहतींसोबतचा व्हिडिओ व्हायरल

‘क्या कोहली बनेगा रे तू?’ म्हणत चाहत्यांनी उडवली पोट वाढत असलेल्या आझमची खिल्ली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---