भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) कारकीर्दीवर आधारित एक चित्रपट काढण्यात आला आहे. आता धोनी ग्राफीक कादंबरीच्या स्वरुपात चाहत्यांना दिसणार आहे. त्याने त्याच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अथर्व: द ओरिजिन'(Atharva The Origin) या ग्राफीक कादंबरीचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे. त्याने स्वत: ही माहिती फेसबुकच्या माध्यामातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. या टीझरमध्ये धोनी अथर्वच्या भुमिकेत दिसत आहे. कॅप्टनकुलने बुधवारी ‘अथर्व: द ओरिजिन’ चा फर्स्ट लुक शेअर केला आहे. त्याच्या या टीझरचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
कॅप्शनमध्ये त्याने लिहले आहे की ‘अथर्व: द ओरिजिन’ ग्राफीक कादंबरीचा फर्स्ट लुक प्रदर्शित करताना आनंद होत आहे. या टीझरमध्ये धोनीला युद्धभुमीवर अॅनिमेटेड अवतार अथर्व म्हणून दाखवण्यात आले आहे. यामध्ये अघोरी अथर्व राक्षसांच्या सेनेशी लढताना दिसत आहे. त्याचा हा टीझर सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अथर्व द ओरिजिन ही रमेश थमिलमनींच्या पुस्तकातील रूपांतरित कादंबरी
धोनीची ‘अथर्व: द ओरिजिन” ला ‘न्यू ऐज ग्राफिक कादंबरी’ असे संबोधले जात आहे. ‘अथर्व: द ओरिजिन’ ही कादंबरी म्हणजे लेखक रमेश थमिलमनी यांच्या त्याचं नावाच्या अप्रकाशित पुस्तकाचे रूपांतर आहे. या कादंबरीला ‘धोनी एंटरटेनमेंट’ने पाठिंबा दिला आहे. ही मीडिया कंपनी धोनी आणि पत्नी साक्षी धोनी यांनी २०१९ मध्ये स्थापन केली होती. या ग्राफिक कादंबरीची निर्मिती विरजू स्टुडिओज आणि मिडास डील प्रायव्हेट लिमिटेड यानी केली आहे.
धोनी एंटरटेनमेंट ने २०२० मध्ये केली ‘न्यू एज ग्राफिक नॉव्हेल’ची घोषणा
‘न्यू एज ग्राफिक नॉव्हेल’ ची घोषणा २०२० मध्ये ‘धोनी एंटरटेनमेंट’नेच केली होती. साक्षी धोनी या कंपनीची व्यवस्थापकीय संचालक आहे. या कादंबरीवर बोलताना ती म्हणाली, “हे पुस्तक म्हणजे एक पौराणिक विज्ञान कथा आहे, ज्यामध्ये एका रहस्यमय अघोरीचा प्रवास सांगण्यात आला आहे. यासोबतच या मालिकेच्या माध्यमातून समाजात सुरू असलेली मोठी मिथक सुद्धा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”
https://www.facebook.com/watch/?v=470958617829737
धोनी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून बरेच प्रोजेक्ट घेऊन येणार धोनी आणि साक्षी
साक्षी धोनी पुढे म्हणाली, “आम्ही या ब्रम्हांडाचे सर्व पैलू निष्पादित करु आणि प्रत्येक पात्र आणि कथा शक्य तेवढ्या अचूकतेने पडद्यावर आणू,हे आम्हाला सुनिश्चित करायचे आहे.” ही मालिका थरारक असल्याच तिनं म्हटलं आहे. धोनी आणि साक्षी यांनी २०१९ मध्ये ‘धोनी एन्टरटेन्मेंट’ द्वारे ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारसाठी ‘रोर ऑफ द लायन’ या त्यांच्या पहिल्या प्रोजेक्ट डॉक्युमेंटरीची निर्मिती केली होती. धोनी आणि साक्षी त्यांच्या मीडिया कंपनीच्या माध्यमातून अजुन बरेच प्रोजेक्ट करण्याचा विचार करत आहेत.
धोनीची कारकीर्द
आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. धोनीही सीएसकेचा कर्णधार म्हणून लिलावात भाग घेणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी नवीन मार्ग शोधत असल्याचे दिसत आहे आणि ‘अथर्व’ त्यापैकी एक आहे. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने भारतासाठी ३५० एकदिवसीय, ९८ टी२० आंतरराष्ट्रीय आणि ९० कसोटी सामन्यांमध्ये १७२६६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने १०८ अर्धशतके आणि १६ शतके झळकावली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसीची तीन विजेतीपदे जिंकली आहेत. तसेच धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर धवनने दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी आभारही केले व्यक्त
भारत-विंडीज वनडे मालिकेचा मार्ग मोकळा! कर्णधार रोहितसह ‘हे’ खेळाडू सरावासाठी मैदानात