आयपीएल 2023 एमएस धोनी याचा शेवटचा आयपीएल हंगाम असणार, अशा चर्चा मागच्या मोठ्या काळापासून सुरू आहेत. सीएसकेला आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणारा धोनी यावर्षीही संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहे. पण तरीही त्याच्या निवृत्तीविषयी येणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि बातम्यांमुळे चाहत्यांना नेहमीच प्रश्न पडलेला असतो. मात्र, आयपीएलमधून निवृत्तीविषयी धोनी आता स्वतःच बोलला आहे आणि चाहत्यांच्या मनाती शंका दूर केली आहे.
आयपीएल (MS Dhoni) कारकिर्दीत धोनीने नुकताच कर्णधार म्हणून आपला 200 वा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात धोनीने 17 चेंडूत 32 धावा केल्या. या धावा करण्यासाठी त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 188.24 होता. असे असले तरी, तो सीएसकेला (CSK) या सामन्यात विजय मिळवून देऊ शकला नाही. धोनीने सीएसकेच्या कर्णधाराच्या रूपात सोमवारी (17 एप्रिल) आपला 201वा सामना आरसीबीविरुद्ध खेळला.
धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आयपीएलमधून निवृत्तीविषयी स्पष्टपणे बोलत आहे. नुकताच आपल्या 5000 आयपीएल धावांचा पार करणारा धोनी पुढेही मोठ्या काळापर्यंत आयपीएल खेळू शकतो, असेच संगेत या व्हिडिओतून चाहत्यांना मिळत आहेत. सीएसकेच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत धोनीला निवृत्तीविषयी प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणत आहे की, “निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ शिल्लक आहे. मी आताच काही बोललो, तर प्रशिक्षकांवर दबाव येईल आणि मी असे करणार नाही.” धोनीने हे उत्तर ज्या पद्धतीने दिले, त्यावर चाहत्यांना असा विश्वास वाटत आहे की, धोनी पुढचे दोन तीन हंगाम सीएसकेसाठी खेळेल.
https://twitter.com/icskian/status/1647818921154859008?s=20
दरम्यान, धोनी मागच्या म्हणजेच आयपीएल 2022 मध्येत सीएसकेच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. पण रविंद्र जडेजा () याच्या नेतृत्वात सीएसके संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्यामुळेच जडेजाने कर्णधारपद सोडले आणि धोनील आयपीएल हंगाम अर्ध्यात असताना धोनी पुन्हा सीएसकेचा कर्णधार बनला. असे असले तरी, धोनीने आधी म्हटल्याप्रमाणे आपले होम ग्राउंडवर चेपॉक स्टेडियमवर निवृत्ती घोषित करू शकतो. कोरोनाच्या कारणास्तव मागचे तीन आयपीएल हंगाम भारताबाहेर खेळले गेले आणि धोनीला होम ग्राउंडवर खेळण्याची संधीही मिळाली नाही. मात्र, यावर्षी चेपॉकवर चाहत्यांसमोर तो अखेरचा सामना खेळू शकतो. (MS Dhoni’s explanation on IPL retirement! Said, ‘If I do that…’)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू मला सॉरी बोलायची गरज नाही’, कुलदीपला असे का म्हणाला हेड कोच पाँटिंग? जाणून घ्याच
राजस्थानच्या खेळाडूकडून रहस्याचा उलगडा, म्हणाला, ‘या’ गोष्टीमुळे संघ सातत्याने होतोय विजयी