नागपुर | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात ३३.३ षटकांत टीम इंडियाने १७४ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली ६९ तर रविंद्र जडेजा ० धावेवर खेळत आहे.
या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर मात्र एक नकोसा विक्रम झाला आहे. धोनी तब्बल ९ वर्षांनी पहिल्याच चेंडूवर ० धावेवर बाद झाला आहे. यालाचा क्रिकेटमध्ये गोल्डन डक असे म्हणतात.
यापुर्वी २०१०मध्ये धोनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच गोल्डन डकवर विशाखापट्टनमला ० धावेवर बाद झाला होता. त्यानंतर तो आजपर्यंत कधीही पहिल्याच चेंडूवर बाद झाला नव्हता.
विशेष म्हणजे धोनी आशिया खंडाबाहेर केवळ एकवेळाच गोल्डन डकवर बाद झाला आहे. धोनी वनडेत १० वेळा शुन्य धावेवर बाद झाला असून त्यातील ५ आता गोल्डन डक म्हणून नोंदवले गेले आहेत.
धोनीचे वनडे कारकिर्दीतील गोल्डन डक-
२००४- विरुद्ध बांगलादेश, चितगाव
२००५- विरुद्ध श्रीलंका, अहमदाबाद
२००७- विरुद्ध विंडीज, पोर्ट ऑफ स्पेन
२०१०- विरुद्ध श्रीलंका, विशाखापट्टनम
२०१९- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नागपुर
#म #मराठी #INDvsAUS #Indvaus #Nagpur #Vidarbha #MSDhoni #Dhoni— Sharad Bodage (@SharadBodage) March 5, 2019