Dhruv Jurel Latest Insta Post:- भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखला जातो. पण कधी-कधी तो मैदानावरील खेळाडूंवर चिडतानाही दिसतो. इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी मालिकेदरम्यान कर्णधार रोहितने युवा खेळाडूंना “कोणीही बागेत फिरायला जाऊ नये”, असे बजावले होते. त्याची ही मजेशीर चेतावणी स्टंप माईकमध्ये कैद झाली होती आणि त्याची जोरदार चर्चादेखील झाली होती. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतरही एका मुलाखतीदरम्यान रोहितला त्याच्या या चेतावणीवरुन चिडवण्यात आले होते. दरम्यान आता त्याच्या सहकारी खेळाडूंनी त्याच्या या चेतावणीवर भन्नाट उपाय शोधला आहे.
त्याचे झाले असे की, टी20 विश्वचषकानंतर भारताची युवा ब्रिगेड टी20 मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेला (India Tour Of Zimbabwe) गेली होती. या युवा भारतीय संघाचे नेतृत्त्वपद शुभमन गिल (Shubman Gill) याच्याकडे सोपवण्यात आले होते. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशी जिंकली. मालिका विजयानंतर भारतीय खेळाडू झिम्बाब्वेत फिरायला गेले होते. येथील काही फोटो यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel) त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने रोहितची मजा घेणारे कॅप्शन जोडले आहे.
ध्रुव जुरेलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्यासोबत अभिषेक शर्मा, खलील अहमद, रवी बिश्नोई आणि आवेश खान देखील आहेत. हे सर्व खेळाडू विमानतळावर बसलेले दिसत आहेत. फोटो शेअर करताना ध्रुव जुरेलने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्हाला बागेत जाण्यास मनाई होती, तर आम्ही विमानतळावर हँग आउट करायला आलोत.”
View this post on Instagram
ध्रुव जुरेलचे हे मजेशीर कॅप्शन चाहत्यांना खूप आवडले असून ते या पोस्टखाली मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
आंद्रे रसलची एक चेंडू आणि ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे, बॅट्समनचे रियाक्शन पाहण्यासारखे!
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?