भारतीय संघाला टी20 विश्वचषक 2024 नंतर लगेच झिम्बाब्वेचा दौरा करायचा आहे. मात्र टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू या दौऱ्यावर जाणार नाहीत. या दौऱ्यावर युवा खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे भारताकडून खेळण्याची संधी न मिळालेल्या काही खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते. या दौऱ्यासाठी यष्टीरक्षकांबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे. वृत्तानुसार, संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांना झिम्बाब्वे दौऱ्यावर यष्टिरक्षक म्हणून पाठवलं जाईल.
भारतीय संघाला टी20 विश्वचषकानंतर लगेच झिम्बाब्वेसोबत 5 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात फक्त युवा खेळाडूंनाच संधी दिली जाणार आहे. रिषभ पंतलाही पाठवलं जाणार नाही. या कारणामुळे ध्रुव जुरेलचा टीम इंडियात यष्टिरक्षक म्हणून समावेश होऊ शकतो. जुरेलनं याआधी भारतासाठी कसोटी सामने खेळले आहेत, परंतु तो मर्यादित षटकांमध्ये खेळला नाही. आता तो झिम्बाब्वेविरुद्ध टी20 मध्ये पदार्पण करू शकतो.
याशिवाय आणखी एक मोठी बातमी येत आहे की, युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवला या दौऱ्यावर पाठवलं जाणार नाही. मयंक यादव इतर खेळाडूंसह एनसीए कॅम्पचा एक भाग आहे. परंतु त्याची कदाचित झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड होणार नाही. आयपीएल 2024 मध्ये तो आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे खूप चर्चेत आला होता. त्यानं आयपीएल 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला होता. मात्र, तो दुखापतीमुळे नियमित खेळू शकला नाही. त्याला अनेक सामन्यांमधून बाहेर व्हावं लागलं.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह सारखे सीनियर खेळाडू टी20 विश्वचषकानंतर एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहेत. हे खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीला लागतील.
महत्त्वाच्या बातम्या –
जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचे नवे फिल्डिंग कोच? गौतम गंभीरशी काय चर्चा झाली?
श्रेयस अय्यरचा होणार टीम इंडियात कमबॅक! रियान पराग, अभिषेक शर्मालाही मिळू शकते संधी
मोठी बातमी! केन विल्यमसननं न्यूझीलंडचं कर्णधारपद सोडलं, केंद्रीय करारही नाकारला