पुणे, 4 सप्टेंबर 2023: अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित व अंडरवॉटर स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत गुजरातच्या धृव टाक, पश्चिम बंगालच्या झोया जन्नत, केरळच्या अभिरामी पीजे या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे सुरू असलेल्या एनईसीसी, वेंकीज, व्हेनकॉब आणि ब्रिजस्टोन यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेत 200मीटर बाय-फिन्स ज्युनियर ड मुलींच्या गटात पश्चिम बंगालच्या झोया जन्नत(02:11: 12सेकंद) वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, तेलंगणाच्या मेरुपुला गौड(02:14: 20सेकंद)ने दुसरा आणि पश्चिम बंगालच्या रायमा चक्रवर्ती (02:18: 91सेकंद)ने तिसरा क्रमांक पटकावला.
200मीटर बाय-फिन्स ज्युनियर क मुलांच्या गटात गुजरातच्या धृव टाक याने (01:58:31सेकंद) वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर, तेलंगणाच्या थन्मय कासुला(01:58: 77सेकंद)ने रजतपदक आणि तामिळनाडूच्या जय जसवंत आर(02:02: 18सेकंद) याने कांस्य पदक पटकावले. 200मीटर बाय-फिन्स ज्युनियर क मुलींच्या गटात केरळच्या अभिरामी पीजे(02:15: 26सेकंद) वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तेलंगणाच्या सई थुटकुरी (02:15:96सेकंद) आणि श्रिजनी गेरापती (02:16: 60सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्यांना खेळाडूंना पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ उत्तर प्रदेशचे सचिव नरेंद्र चौहान, अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ पंजाबचे सचिव विकेश अरोरा, अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ पश्चिम बंगालचे सचिव कांकन पाणिग्रही, अंडरवॉटर स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार अचंता पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. (Dhruv Tak, Zoya Jannat, Abhirami PJ win 3rd National Finswimming Championship 2023)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार:
200मीटर बाय-फिन्स ज्युनियर क गट: मुली:
1.अभिरामी पीजे(केरळ, 02:15: 26सेकंद), 2.सई थुटकुरी (तेलंगणा, 02:15:96सेकंद), 3.श्रिजनी गेरापती (तेलंगणा,02:16: 60सेकंद);
200मीटर बाय-फिन्स ज्युनियर क गट मुले:
1. धृव टाक(गुजरात, 01:58:31सेकंद), 2.थन्मय कासुला(तेलंगणा,01:58: 77सेकंद), 3.जय जसवंत आर(तमिळनाडू, 02:02: 18सेकंद);
200मीटर बाय-फिन्स ज्युनियर ड गट मुली:
1.झोया जन्नत(पश्चिम बंगाल, 02:11: 12सेकंद), 2.मेरुपुला गौड(तेलंगणा, 02:14: 20सेकंद), 3.रायमा चक्रवर्ती (पश्चिम बंगाल, 02:18: 91सेकंद);