---Advertisement---

बीसीसीआय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पाकिस्तानमध्ये दाखल, खास सामन्यासाठी लावणार स्टेडियममध्ये उपस्थिती

Zaka Ashraf Roger Binny Rajiv Shukla
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात मागच्या काही दिवसांपूर्व चांगलेच घमासान रंगले होते. आशिया चषक 2023च्या यजमानपदावरून पेटलेला हा वाद हायब्रिड मॉडेलवर सोडवण्यात आला. अशातच बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला सोमवारी (4 सप्टेंबर) पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी (5 सप्टेंबर) अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यासाठी हे दोघेही स्टेडियममध्ये उपस्थित असतील.

2008 साली भारताता मुंबई बॉम्बस्फोटानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नाते अधिकच तानले गेले. दोन्ही देशांमधील संबंध अद्याप सुधारलेले नाहीत. क्रिकेटवर देखील या हल्ल्यामुळे चांगलाच परिणाम झाला. 2008 नंतर भारतीय क्रिकेट संघ एकदाही पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यासाठी गेला नाहीये. सोबतच बीसीसीआय अधिकरी देखील यादरम्यानच्या काळात पाकिस्तान दौऱ्यावर गेले नव्हते. पण तब्बल 15 वर्षांच्या काळानंतर आता पहिल्यांदा बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. सोमवारी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny), उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी पीसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पीसीबी अध्यक्ष झका अश्रफ (Zaka Ashraf) यांच्यासोबत या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास तयार नाही, असा हट्ट बीसीसीआयने धरला होता. याच कारणास्तव यावर्षीचा आशिया चषक हायब्रिड मॉडेलवर खेळवला जात आहेत. या मॉडेलनुसार भारत आपले सर्व सामने पाकिस्तानबाहेर खेळेल. सोबतच बाद फेरी आणि अंतिम सामना देखील पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार नाही. भारतीय संघाच्या हट्टामुळेच श्रीलंकेत आशिया चषकाचे 9, तर यजमान पाकिस्तानध्ये 4 सामने आयोजित केले गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 
दिग्गज रॉस टेलरचा मोठा विक्रम विराटकडून मोडीत! मिळवला खास यादीत चौथा क्रमांक
नेपाळच्या सलामीवीराने काढला भारतीय गोलंदाजांचा घाम! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---