गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद प्रत्येकाला माहीत आहे. दोन्ही भारतीय संघाचे दिग्गज असून इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये या दोघांमधील वाद पाहायला मिळाला होता. सोमवारी (4 सप्टेंबर) लाईव्ह सामन्यादरम्यान स्टेडियममधील प्रक्षकांकडून गंभीरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. पण दिग्गज फलंदाजांनी जशास तसे उत्तर दिले.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हणजेच आयपीएलमध्ये दोन वेळा विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात वाद झाला आहे. 2013 आणि 2023 आयपीएल हंगामांमध्ये या दोघांमधील वाद चर्चेचा विषय ठरला. सोमवारी (4 सप्टेंबर) आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि नेपाळ संघ आमने सामने होते. गौतम गंभीर या सामन्यात समालोचकाची भूमिका पार पाडत असून विराट भारतीय संघासाठी खेळत होता. सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे काही वेळासाठी खेळ थांबवला गेला होता. यादरम्यानच गंभीर स्टॅन्डमधून जाताना दिसला. गंभीरला पाहताच प्रेक्षकांमधून विराट-विराट असा आवाज येऊ लागला. गंभीरच्या हे लक्षात येताच त्याने आवाज करणाऱ्या प्रेक्षकांना मीडल फिंगर दाखवली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CwxYK99PYXx/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
(Gautam Gambhir Reacted When Crowd Chanting Kohli Kohli)
भारत विरुद्ध नेपाळ सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
नेपाळ – असिफ शेख, कुशल भुर्टेल,रोहित पौडेल (कर्णधार), भीम, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण छेत्री, ललित राजबंशी.
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पाकिस्तानमध्ये दाखल, खास सामन्यासाठी लावणार स्टेडियममध्ये उपस्थिती
दिग्गज रॉस टेलरचा मोठा विक्रम विराटकडून मोडीत! मिळवला खास यादीत चौथा क्रमांक