पुणे (28 मार्च 2024) – क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीचे सामने सुरू आहेत. रेलीगेशन फेरीत आतापर्यंत धुळे व जालना संघाने 2-2 सामने जिंकले आहेत. तर रायगड व नाशिक संघाने आज पहिला विजय मिळवला. काळ या दोन संघात झालेला सामना बरोबरीत सुटला होता. रेलीगेशन मध्ये सातारा, लातूर व धाराशिव संघाला अजून एकही विजय मिळवला आला नाही.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात रायगड संघाने नांदेड संघाला 33-22 अश्या फरकाने हरवत रेलीगेशन फेरीतील पहिला विजय मिळवला. रायगड संघाकडून धिरज बैलमारे याने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. वैभव मोरे ने पकडीत एकूण 3 गुण मिळवले. तर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात धुळे संघाने धाराशिव संघाचा 73-17 असा धुव्वा उडवला. धुळेच्या अक्षय पाटील ने सर्वाधिक 24 गुण मिळवले. राज कुंवर व वैभव बोरसे ने बचावफळीत उत्कृष्ट खेळ करत हाय फाय पूर्ण केला.
आजच्या तिसऱ्या सामन्यात जालना टीम ने 49-22 असा लातूर संघावर विजय मिळवला. जालना संघाकडून रोहित बिन्नीवले ने अष्टपैलू खेळ करत एकूण 17 गुण मिळवले. सनी राठोड व ओमराज वखर्डे यांनी पकडीत प्रत्येकी 3 गुण मिळवले. आजच्या चौथ्या सामन्यात नाशिक संघाने 33-24 अशी सातारा संघावर मात देत पहिला विजय मिळवला. नाशिक कडून शिवकुमार बोरगुडे सर्वाधिक 12 गुण मिळवले. ईश्वर पथाडे ने चढाईत 5 गुण मिळवले. ज्ञानेश्वर शेळके ने पकडीत एकूण 4 गुण मिळवले. (Dhule and Jalna team’s second win in a row in the relegation round.)
रेलीगेशन फेरी गुणतालिका.
1. धुळे – 12 गुण (2 सामने)
2. जालना – 11 गुण (2 सामने)
3. रायगड – 9 गुण (2 सामने)
4. नाशिक – 9 गुण (2 सामने)
5. नांदेड – 5 गुण (2 सामने)
6. सातारा – 1 गुण (2 सामने)
7. धाराशिव – 1 गुण (2 सामने)
8. लातूर – 0 गुण (2 सामने)
महत्वाच्या बातम्या –
रेलीगेशन फेरीत जालना संघाचा सलग दुसरा विजय, तर लातूर संघाचा दुसरा पराभव
रेलीगेशन फेरीत रायगड संघाची नांदेड संघावर मात