पुणे (27 मार्च 2024) – रेलीगेशन फेरीचा दुसरा सामना धुळे विरुद्ध लातूर यांच्यात झाला. दोन्ही संघानी सावधगिरी खेळ करत सामन्याला सुरुवात केली होती. पहिल्या 3 मिनिटाच्या खेळात सामना 1-1 असा बरोबरीत सुरू होता. त्यानंतर धुलेच्या अक्षय पाटील ने आक्रमक खेळ करत चढाईत गुण मिळवले. धुळे संघाने सामन्याच्या 8 व्या मिनिटाला लातूर संघाला ऑल आऊट करत 10-03 अशी आघाडी मिळवली होती.
लातूरच्या अजिंक्य कटले व प्रदिप आकांगिरे यांनी चढाईत गुण मिळवत संघाची पिछाडी कमी केली. धुळे संघावर लोन ची नामुष्की आली होती मात्र धुलेच्या राज कुंवर ने सुपर टॅकल करत तर पुढील चढाईत मुकेश सोनवणे ने 2 गुण मिळवत पुन्हा एकदा धुळे संघाची आघाडी वाढवली. मध्यंतराला धुळे संघाकडे 19-11 अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर सामना सुरू झाल्यावर अजिंक्य कटले बे चढाईत तर प्रणव भाटिगिई ने पकडीत गुण मिळवत लातूर संघाची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला.
धुलेच्या अक्षय पाटील व मुकेश सोनवणे यांनी चढाईत गुण मिळवत संघाची आघाडी कमी होऊ दिली नाही.
धुळेच्या वैभव बोरसे ने अष्टपैलू खेळ करत हाय फाय पूर्ण केला तसेच चढाईतही गुण मिळवले. धुळे संघाने 43-26 असा रेलीगेशन फेरीत पहिला विजय मिळवला. धुळे संघाकडून अक्षय पाटील ने चढाईत 14 गुण तर पकडीत 2 गुण मिळवले. वैभव बोरसे ने पकडीत 7 तर चढाईत 3 गुण मिळवले. लातूर कडून अजिंक्य कटले सर्वाधिक 8 गुण मिळवले. तसेच प्रणव भाटिगिई ने पकडीत 4 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- अक्षय पाटील, धुळे
बेस्ट डिफेंडर- वैभव बोरसे, धुळे
कबड्डी का कमाल- वैभव बोरसे, धुळे
महत्वाच्या बातम्या –
धोनी भूतकाळात गेला आहे? सीएसकेच्या माजी कर्णधाराचे ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडून कौतुक
रेलीगेशन फेरीचा रायगड विरुद्ध नाशिक पहिला सामना बरोबरीत