---Advertisement---

युवा कबड्डी सिरीजच्या रेलीगेशन मध्ये धुळे संघाचा पाचवा विजय

---Advertisement---

पुणे (2 एप्रिल 2024) – युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीतील सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज पहिला सामना धुळे विरुद्ध जालना यांच्यात झाला. दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे हा सामना एक औपचारिकता होती. धुळेच्या जैवर्धन गिरासे ने आपल्या पहिल्या चढाईत 2 गुण मिळवत संघाचे खात उघडला. जैवर्धन ने चढाईत तर राकेश पाटील ने पकडीत गुण मिळवत जालना संघाला ऑल आऊट करत 12-02 अशी आघाडी मिळवली.

धुळे संघाने आक्रमक खेळ करत आपली आघाडी वाढवली. अक्षय पाटील ने जोरदार चढाया करत गुण मिळवले. मध्यंतराला धुळे संघाने 22-11 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतर धुळे संघाने आक्रमक खेळ करत जालना संघाला ऑल आऊट केले. अक्षय पाटील ने सुपर टेन पूर्ण केला तर राकेश पाटील ने हाय फाय पूर्ण केला. जैवर्धन गिरासे ने सुद्धा सुपर टेन पूर्ण करत महत्वपूर्ण गुण मिळवले.

संपूर्ण सामन्यात धुळे संघाने 3 वेळा ऑल आऊट करत सामना 52-31 असा जिंकला. धुळे कडून जैवर्धन गिरासे ने चढाईत 12 गुण मिळवले. अक्षय पाटील ने चढाईत 10 तर पकडीत 2 गुण मिळवले. बचावफळीत राकेश पाटील ने 8 गुण तर रोहित पाटील ने 3 गुण मिळवले. जालना कडून प्रकाश चव्हाण व वीरेंद्र मंडलिक ने 7 गुण मिळवले. धुळे व जालना संघाचा हा स्पर्धेतील शेवटचा सामना होता.

बेस्ट रेडर- जैवर्धन गिरासे, धुळे
बेस्ट डिफेंडर- राकेश पाटील, धुळे
कबड्डी का कमाल – जैवर्धन गिरासे, धुळे

महत्त्वाच्या बातम्या-

रेलीगेशन फेरीतील टॉप 2 संघ प्ले-ऑफ साठी पात्र

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीला सुरुवात

रेलीगेशन फेरीत लातूर संघाची नांदेड संघावर मात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---