पुणे (1 एप्रिल 2024) – आजचा शेवटचा सामना धुळे विरुद्ध सातारा यांच्यात झाला. धुळे संघ तीन विजयासह तिसऱ्या स्थानावर होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण सामना होता. या सामन्यासह उद्याचा सामना मोठ्या फरकाने जिंकून प्ले-ऑफस मध्ये जाण्याचा आशा कायम ठेवायच्या होत्या. जैवर्धन गिरसे ने आपल्या पहिल्या चढाईत गुण मिळवत संघाचा खात उघडला. तर यश निकम ने सातारा संघाचा खात उघडला.
सामना अत्यंत चुरशीचा झाला. 8 मिनिटांच्या खेळानंतर सामना 5-5 असा बरोबरीत सुरू होता. सातारा संघाकडून यश निकम ने चढाईत गुण मिळवले तर धुळे संघाकडून जैवर्धन गिरासे ने गुण मिळवत सामन्यात रंगत आणली होती. मध्यंतराला धुळे संघाकडे 11-10 अशी केवळ 1 गुणांची आघाडी होती. मध्यंतरा नंतर धुळे कडून अक्षय पाटील ने गुण मिळवत संघाची आघाडी वाढवली होती. सातारच्या यश निकम ने त्याला प्रतिउत्तर देत सामना 14-14 असा बरोबरीत आणला.
यश निकम ने 4 गुणांची सुपर रेड करत सातारा संघाला 19-14 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटची 7 मिनिटं शिल्लक असताना सातारा संघाकडे 23-18 अशी आघाडी घेतली होती. उत्तराधार्थ धुळेच्या अक्षय पाटील ने जोरदार चढाया करत पिछाडी कमी केली. अखेरच्या चढाईत आधी धुळे संघ 2 गुणांच्या पिछाडीवर होता. अखेरच्या चढाईत अक्षय पाटील ने सातारा संघाला ऑल आऊट करत सामना 30-29 असा जिंकला.
बेस्ट रेडर- जैवर्धन गिरासे, धुळे
बेस्ट डिफेंडर- आनंद शिंदे, सातारा
कबड्डी का कमाल – वैभव बोरसे, धुळे
महत्त्वाच्या बातम्या-