भारत विरुद्ध आयर्लंड संघात झालेला पहिला टी२० सामना रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने भारताला १०९ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ९.२ षटकातच आयर्लंडचे लक्ष्य पूर्ण केले आणि ७ विकेट्सने सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने या सामन्यादरम्यान चक्क २०० किमी दर ताशी वेगाने चेंडू फेकला.
त्याचे झाले असे की, आयर्लंडचा संघ (IRE vs IND) प्रथम फलंदाजीसाठी आला. यावेळी भारताकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhvneshwar Kumar) याने पहिले षटक टाकले. त्याच्या षटकातील दुसराच चेंडू चक्क २०१ किमी दर ताशी वेगाने (Bhuvneshwar Kumar 201KMPH Bowl) फेकला गेल्याचे टीव्ही स्क्रिनवर दाखवण्यात आले. तर त्यापाठोपाठ त्याने फेकलेल्या चेंडूची गती तर थेट २०८ किमी दर ताशी दिसली. भुवनेश्वरने इतक्या तुफान वेगाने गोलंदाजी केल्याचे पाहून दर्शकांच्या भुवया उंचावल्या.
0.1 : 201kmph
0.2 : 208kmph
0.4 : 227kmph pic.twitter.com/vHUbZYrKCY— Thala (@Thala49081393) June 27, 2022
Shoaib Akhtar, Umran Malik who??? Bhuvi just bowled the fastest ball ever.🤣🤣 Real pic, just took ss pic.twitter.com/2wDDDJQ6gK
— Usama Kareem (@UsamaKarem2) June 26, 2022
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्या नावावर आहे. त्याने २००३ विश्वचषकात १६१.३ किमी दर ताशी वेगाने इंग्लंडविरुद्ध चेंडू फेकला होता. अजूनही त्याचा हा विश्वविक्रम कोणी मोडू शकलेला नाही. अशात जेव्हा भुवनेश्वरने २०० किमी दर ताशी पेक्षाही जास्त वेगाने चेंडू फेकल्याचे दिसले, तेव्हा सर्वांना आश्चर्य होणे साहजिक होते.
https://twitter.com/Crickfantastic1/status/1541119027723919361?s=20&t=yZ5irZBShu1BFHjJ9BOZtg
परंतु नंतर समजले की, स्पिडोमीटरच्या तांत्रिक बिघाडामुळे चेंडूची इतकी गती दिसली. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आयर्लंड क्रिकेट बोर्डाची मजा घ्यायला सुरू केली आहे. एका चाहत्याने तर म्हटले आहे की, जर हसन अली २१९ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करू शकतो, तर भुवनेश्वर कुमार २०१ किमी दर ताशी वेगाने चेंडू का फेकू शकत नाही.
भुवनेश्वर कुमारचे गोलंदाजी प्रदर्शन
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात ३२ वर्षीय भुवनेश्वरने ३ षटके गोलंदाजी करताना १६ धावा देत १ विकेट घेतली. आयर्लंडचा कर्णधार ऍंड्र्यू बालबिर्नी याला त्याने शून्यावर बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध इंग्लंडचा सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवे वेळापत्रक एका क्लिकवर
मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित ‘या’ कारणामुळे वागतात खडूसपणे, दिग्गजाची आहे शिकवण
जगात ५००० पेक्षा अधिक क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच