‘स्टेनगन’ या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन मंगळवारी (27 जून) आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टेन जगभरातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये नेहमीच गणला गेला.
त्याचा जन्म 27 जून, 1983 ला फालबोरवा येथे झाला होता. आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या स्टेनने डिसेंबर, 2004 ला इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर जवळपास 17 वर्षांनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे.
स्टेनने त्याच्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेकडून एकूण 93 कसोटी सामने, 125 वनडे सामने आणि 47 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत 22.95 च्या सरासरीने 439 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने 25.95 च्या सरासरीने 196 विकेट्स घेतल्या आहेत, तर टी20 त त्याने 18.35 च्या सरासरीने 64 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याच्या काही खास विक्रमांबद्दल जाणून घेऊया
-स्टेन जगातील एकमेव असा वेगवान गोलंदाज आहे, ज्याने 9 कसोटी खेळणाऱ्या प्रमुख संघांविरुद्ध एका डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच 200 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत त्याचा स्टाईक रेट सर्वात्तम म्हणजेच 42.3 आहे.
-याव्यतिरिक्त कसोटी क्रिकेटमध्ये 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 500 पेक्षा अधिक धावा करणारा तो तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज आहे. त्याने 568 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आतापर्यंत कसोटीत 119 डावांमध्ये 1251 धावा केल्या आहेत.
-आयसीसीच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत स्टेनने सातत्याने 6 वर्षांपर्यंत अव्वल स्थान पटकावले होते. तो 2010 ते 2015 यादरम्यान अव्वल क्रमांकावर राहिला आहे.
-2019 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या स्ट्रीटवाईस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कसोटी क्रिकेट प्रकारात तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेने वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास! भारताचा ‘हा’ रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त 14 धावा पडल्या कमी
‘तुझ्याकडे पैसा जास्त आणि माझ्याकडे…’, ब्रावोने पोलार्डला पुन्हा केले ट्रोल, पाहा व्हिडिओ