---Advertisement---

सचिनचा मुंबई इंडियन्सला टाटा-गुडबाय? सोशल मीडियावर रंगलीय एकच चर्चा, लगेच वाचा

On: रविवार, डिसेंबर 17, 2023 3:56 PM
Sachin-Tendulkar
---Advertisement---

Sachin Tendulkar Mentor: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच चर्चांना उधाण आलं आहे. स्पर्धेचा लिलाव येत्या 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी घडलेल्या काही घटनांमुळे जगभरात चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्या याला रोहित शर्माच्या जागेवर बसवले आहे. म्हणजेच, रोहितला कर्णधारपदावरून हटवत त्याच्या जागी पंड्याला कर्णधार बनवले आहे. यामुळे चाहते खूपच निराश झाले आहेत. अशात आणखी एक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे सचिन तेंडुलकरही सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

सचिन तेंडुलकरने सोडलं मेंटॉरपद?
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर टीकास्त्र डागले. याच दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसला. माध्यमांतील वृत्तांनुसार, रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद (Mumbai Indians Mentor) सोडले आहे. मात्र, याच्याशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. मात्र, ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर ही बातमी भलतीच व्हायरल होत आहे.

https://twitter.com/kalAnkit_life/status/1736307671069024312

https://twitter.com/jatinbishnoi290/status/1736304665808216431

https://twitter.com/dolan_virat/status/1736303904638316723

https://twitter.com/cric_amrit/status/1736301930698482036

काही युजर्स ही बातमी फेक असल्याचे म्हणत आहेत. एकाने लिहिले की, “सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या मार्गदर्शक पदावरून पायउतार झाला असल्याच्या खोट्या बातम्या तासाभरापासून सोशल मीडियावर पसरल्या आहेत.”

सचिनने केलंय मुंबईचे नेतृत्व
सचिन तेंडुलकर मूळचा मुंबईचा रहिवासी आहे. तसेच, आयपीएलच्या सुरुवातीपासूनच तो या संघाशी जोडला गेला आहे. तो या संघाचा आयकॉन खेळाडू असण्यासोबतच त्याने कर्णधारपदही भूषवले आहे. सचिनने 2009 ते 2011दरम्यान मुंबईचे नेतृत्व केले आहे. 2013मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन मार्गदर्शक म्हणून संघाशी जोडला गेला आहे.

अर्जुन तेंडुलकरही संघाचा भाग
मुंबई इंडियन्सकडून फक्त सचिनच नाही, तर त्याचा लेक अर्जुन तेंडुलकर हादेखील जोडला गेला आहे. अर्जुनला मुंबईने आयपीएल 2021 मध्ये आपल्या ताफ्यात घेतले होते. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सचिनच्या लेकाने 2023मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. त्याने हंगामात 4 सामने खेळले आणि 3 विकेट्सही घेतल्या होत्या. (did master blaster sachin tendulkar resign as mumbai indians mentor know the truth)

हेही वाचा-
लायन…नाम तो सुना होगा! पाकिस्तानविरुद्ध घडवला इतिहास, बनला कसोटीत ‘असा’ पराक्रम करणारा जगातला 8वा बॉलर
अर्शदीप जोमात, फलंदाज कोमात! पहिल्याच ओव्हरमध्ये पठ्ठ्याने दोघांचा काढला काटा, शून्यावर परतले तंबूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---