आयपीएल 2024 आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मा याला हटवून हार्दिक पंड्या याला संघाचा कर्णधार बनवले आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रतिक्रियांचा महापूर आला आणि या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या एमएस धोनी याच्या चेन्नई सुपर किंग्जनेही याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदाला सीएसकेने खास शब्दात मावंदना दिली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 11 हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आणि 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. 2013 हंगामाच्या मध्यात त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि तेव्हापासून गेल्या 11 हंगामात मुंबई इंडियन्सला नवीन उंचीवर नेणाऱ्या रोहित शर्माने मागे वळून पाहिले नाही. यामुळेच सीएसकेसह मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.
रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्याची बातमी समोर आल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने एक चांगली पोस्ट करत रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रतिक्रिया दिली आहे. सीएसकेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “एमएस धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा यांच्यात 2013 ते 2023 या दशकापर्यंत स्पर्धा होती. रोहित शर्माबद्दल खूप आदर आहे.”
2013 ➡️ 2023 : A decade of spirited challenge! Much respect, Rohit! ???????? pic.twitter.com/B8rqCmmT5R
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 15, 2023
खरं तर, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोघांनी प्रत्येकी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. या कारणास्तव दोन्ही संघांमधील प्रतिस्पर्धी जोरदार आहे. सीएसकेने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ही पाचही जेतेपदे जिंकली आहेत आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ही पाच अजिंक्यपदे जिंकली आहेत आणि त्यामुळेच जेव्हा हे खेळाडू आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एकमेकांना सामोरे जायचे तेव्हा सर्वांच्या नजरा कोण चांगला खेळेल याकडे होत्या. (Dhoni’s Chennai is the most saddened by the removal of Rohit from the post of captain)
हेही वाचा
INDvsSA: वनडे मालिकेत द्रविड नसेल भारताचा मुख्य प्रशिक्षक, ‘हे’ असतील नवे Head Coach; काय कारण?
कॅप्टन सूर्या अन् अर्शदीपचं वाजलं? टीम इंडियाच्या बसमध्येच गोलंदाजावर चिडला Sky, पाहा Video






