Head Coach Rahul Dravid ODI Series: 3 सामन्यांची टी20 मालिका 1-1ने बरोबरीत सुटल्यानंतर आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भिडणार आहेत. या मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ जोहान्सबर्ग येथे पोहोचला आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा केएल राहुल याच्याकडे असणार आहे. मात्र, संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
द्रविड नसेल वनडे मालिकेचा भाग
भारतीय संघात युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांनी वनडे संघात पुनरागमन केले आहे. अशात भारतीय संघासाठी वनडे मालिकेत आणखी एक बदल करण्यात आला आहे. वनडे मालिकेसाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि त्याचा सध्याची टीम उपलब्ध नसेल. द्रविडसह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप वनडे मालिकेसाठी संघाचा भाग नसतील.
कसोटी मालिका महत्त्वाची
अशात द्रविडच्या जागी भारतीय संघासाठी फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक राजीब दत्ता आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा उपलब्ध असतील. द्रविडची टीम वनडे मालिकेत उपलब्ध नसण्यामागील खरं कारण कसोटी मालिका आहे. खरं तर, द्रविडला कसोटी मालिकेवर लक्ष द्यायचे आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे.
भारतीय संघ करेल 31 वर्षांच्या दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न
मागील 31 वर्षांपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर कोणतीही वनडे मालिका जिंकू शकला नाहीये. अशात भारतीय संघ या मालिकेत विजय मिळवून 31 वर्षांचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. माजी क्रिकेटपटूंच्या मते, कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे कसोटी मालिका जिंकून वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मिळालेला पराभव विसरण्याची मोठी संधी आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल मालिका
खरं तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारी कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25चा भाग आहे. तसेच, आणखी एक मोठी बातमी अशी की, फिटनेसच्या कारणामुळे मोहम्मद शमी कसोटी संघातून बाहेर पडला आहे. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे आणि 3 जानेवारीपासून केपटाऊनच्या न्यूलँड्समध्ये दोन कसोटी सामन्यात भारतापुढे दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान असेल. (india head coach rahul dravid will not be available for team india odi series against south africa 2023 read here)
हेही वाचा-
कॅप्टन सूर्या अन् अर्शदीपचं वाजलं? टीम इंडियाच्या बसमध्येच गोलंदाजावर चिडला Sky, पाहा Video
हरमनसेनेची कमाल! एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडला 347 धावांनी चारली धूळ, दीप्ती शर्मा विजयाची नायिका