करूण नायरची वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय संघात निवड करण्यात आलेली नाही. तसेच त्याला संपुर्ण इंग्लड दौऱ्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे नाराज करूण एका मुलाखती दरम्यान आपल्याला काही संघ व्यवस्थापनाकडून काहीही कळवण्यात आले नव्हते असे करूणने सांगितले आहे.
त्यावर चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की करुणचा वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत त्याची निवड झाली नाही. त्यावेळी त्याच्याशी लगेच संवाद साधून त्याला संघात कसे स्थान मिळवण्याचे याची माहिती दिली होती.
1. करुण कसोटीत त्रिशतक झळकावणारा वीरेंद्र सेहवागनंतर 2 खेळाडू आहे. इंग्लडविरूद्धच्या मालिकेत त्याला एकदाही संधी देण्यात आली नव्हती. त्यांनतर त्याला वेस्ट इंडिजसोबतच्या मालिकेतही संघात स्थान देण्यात आलेले नाही.
2.नायरने एका टिव्ही मुलाखती दरम्यान म्हटले होते, मला संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीकडून या बद्दल काहीही विचारणा करण्यात आली नव्हती.
3. मुख्य निवड समितीचे सदस्याने त्यावर म्हटले आहे की संवाद ही आमची मजबुत बाजू असून करूण सोबत संवाद साधून त्याला संघात का घेतलेे नाही त्याची माहिती देण्यात आली होती.
4. करूण निराश व्हावा नाही म्हणून निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांनी त्याच्यासोबत त्यावर चर्चा केली होती. त्याला संधीची वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याला रणजी ट्राॅफीत चांगली कामगिरी करत रहाव लागेल असेही त्यांनी सांगितले.
5. कसोटी क्रिकेटमधील भविष्यातील नियोजनासाठी त्याचा विचार केला आहे. त्यामुळे त्याने घरगुती क्रिकेटकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
- टाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू
- आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लिओनचा पाकिस्तानला दणका क्रिकेटमध्ये भीमपराक्रम
- टेन्शनमध्ये असलेल्या रहाणेने विंडीज मालिकेसाठी केली ही खास गोष्ट