आज (२० मार्च) जगभरात जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे. दरवर्षी २० मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. चिमणी संवर्धनाविषयी जनजागृती करणे हा त्याचा हेतू आहे. वास्तविक, हा पक्षी गेल्या काही वर्षांपासून हळूहळू नामशेष होत आहे. एक वेळ असा होता जेव्हा आपण दररोज सकाळी या पक्ष्याच्या किलबिलाट ऐकत होतो. मात्र, आज या पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. चिमण्यांची ही परिस्थिती पाहता २०१० पासून जगभरात ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा केला जातो. आपल्या आसपास दिसणाऱ्या या नाजुक पक्षाचा क्रिकेटची देखील संबंध आला आहे. त्याबाबतचा हा आगळावेगळा किस्सा.
चिमणी जखमी झाली आणि…
ही घटना १९३६ सालामधील आहे. १९३६ मध्ये इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडमध्ये मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) आणि केंब्रिज विद्यापीठ यांच्यात क्रिकेट सामना खेळला जात होता. या सामन्यात भारताचे जहांगीर खान केंब्रिज विद्यापीठाकडून खेळत होते. सामन्यादरम्यान जहांगीर गोलंदाजी करीत असताना चेंडू अचानक एका चिमणीला लागला.
जहांगीर यांच्या चेंडूने चिमणी गंभीर जखमी झाली आणि त्यानंतर काही काळाने तीचा मृत्यू झाला. त्यानंतर तो चेंडू व चिमणी लॉर्ड्सच्या संग्रहालयात ठेवण्यात आला. तिला ‘स्पॅरो ऑफ लॉर्ड्स’ असे नाव देण्यात आले आहे. हा चेंडू आणि चिमणी आजही लॉर्ड्स संग्रहालयात पाहायला मिळते.
📅 Today is also #WorldSparrowDay!
😳 Did you know a cricket ball, bowled by former @BCCI cricketer Jahangir Khan in 1936, unfortunately killed a sparrow at Lord's?
It was consequently stuffed & is now on display in the MCC Museum. #LoveLords pic.twitter.com/1ShdC48DH3
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) March 20, 2018
भारत आणि पाकिस्तानसाठी खेळले क्रिकेट
जहांगीर यांनी स्वातंत्र्यापूर्वी भारतासाठी चार कसोटी सामने खेळले. त्यानंतर, काही काळ जहांगीर खान हे भारतीय संघाची निवडकर्ता बनले. मात्र, फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थायिक झाले. पाकिस्तानमध्येही ते क्रिकेटशी संबंधित राहिले. काही काळ ते पाकिस्तान राष्ट्रीय संघाचे निवडकर्ता होते. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू माजीद खान हे त्यांचे सुपुत्र तर, बाजीद खान हे नातू होत.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीचे कर्णधारपद हाती घेताच डू प्लेसिसने विरोधी संघासाठी वाजवली धोक्याची घंटी? व्हिडिओ पाहाच