बुधवारी(१५ नोव्हेंबर) फुटबॉल जगतावर दु:खाचा डोंगर कोसळला. दिग्गज अर्जेटाईन फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. मॅराडोना यांना महान फुटबॉलपटूंपैकी एक मानले जाते.
३० ऑक्टोबर १९६० ला अर्जेंटिंनामधील लानस येथे जन्म झालेल्या मॅराडोना यांनी अनेक अविस्मरणीय गोल केले आहेत. आजही त्यांच्या खेळाविषयी चर्चा होते. त्यांनी ऍटॅकिंग मिडफिल्डर पोझिशनलला एक वेगळी ओळख दिली.
मॅराडोना यांचे फुटबॉलमधील पदार्पण –
दिएगो मॅराडोना यांनी १९७६ ला अर्जेंटिनोस ज्यूनियर संघाकडून व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले. या संघासाठी ते ५ वर्षे खेळले. यावेळी त्यांनी १६७ सामन्यांत ११५ गोल केले. त्यानंतर सन १९८२ ला मॅराडोना यांचे ५ मिलियन युरोला बार्सिलोना क्लबला ट्रान्सफर करण्यात आले.
त्यांनी १९७६ ला अर्जेंटिनाकडून हंगेरीविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पण त्यांना १९७८ च्या विश्वचषकासाठी संधी मिळाली नाही. त्यांनंतर त्यांनी १९७९ ला फिफा वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपमध्ये अर्जेंटिनाकडून शानदार कामगिरी केली होती. ती स्पर्धा अर्जेंटिनाने जिंकली. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर वरिष्ठ संघाकडून खेळताना पहिला गोल स्कॉटलंड विरुद्ध सन १९७९ ला केला.
विश्वचषक १९८६ ला त्यांनी अर्जेंटिनाचे नेतृत्व करताना विजेतेपद मिळवून दिले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १६ सामन्यांत अर्जेंटिनाचे नेतृत्व केले. १९८६ ला त्यांना मानाचा गोल्डन बॉल आणि सिल्हर शुज मिळाला होता.
तसेच याच विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध त्यांच्या हाताला बॉल लागून गोल झाला होता. त्यावेळी रेफ्रीला ही गोष्ट लक्षात आली नव्हती. पण सामन्यानंतर मॅराडोना यांनी हाताला बॉल लागल्याचे कबुल केले आणि या गोलला त्यांनी स्वत:च ‘हँड ऑफ गॉड’ असे म्हटले.
त्यांनी क्लॅब फूटबॉल बार्सिलोना ज्युनियर, नापोली व बार्सिलोनाकडून खेळले. त्यांनी नापोलीला त्यांच्या नेतृत्वाखाली सिरिज ए चे २ वेळा विजेतेपद मिळवून दिले.
वादाशी जोडले नाते
मॅराडोना यांना कोकेनचे व्यसन होते. ज्यामुळे त्यांचे आणि बार्सिलोनाचे डायरेक्टर यांच्यात वाद झाला. त्यामुळे मॅराडोना यांना ६.९ मिलियन डॉलरला नापोली संघाला विकण्यात आले.
१९९१ ला त्यांची उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर १५ महिन्यांसाठी फुटबॉल खेळण्यावर बंदी घालण्यात आली.
कारकिर्दीतील आकडेवारी –
मॅराडोना यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ३१२ गोल केले. त्यांनी विश्वचषकातील २१ सामन्यात ८ गोल आणि ८ असिस्ट केले आहेत. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत ते अर्जेटिनाचे दुसऱ्या क्रमांकाचे फुटबॉलपटू आहेत.
त्यांच्या निवृत्तीनंतर मॅराडोना यांना फिफाचा शतकातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कारही देण्यात आला.
निवृत्तीनंतर ते काही चॅरीटी सामन्यातही खेळले.
वाचा –





