भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध स्थगित झालेल्या मागील वर्षीच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यासाठी सज्ज होत आहे. हा सामना १ जुलै पासून ते ५ जुलैपर्यंत खेळला जाईल. मात्र मागील वर्षापासून ते आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये खूप बदल झाले आहेत. संघाच्या कर्णधारापासून ते त्यांच्या प्रशिक्षकांपर्यंत सर्वच काही बदलेले आहे. भारतासाठी राहुल द्रविड तर इंग्लंडसाठी ब्रेंडन मॅकल्लम यांनी प्रशिक्षकपदाचे काम सांभाळले आहे. मात्र त्यांच्या काम करण्याची शैली मात्र वेगळी आहे. चला तर पाहुयात की दोन्ही प्रशिक्षकांचे काम करण्याची शैली कशी वेगळी आहे?
सतत बदल विरुद्ध सातत्य
इंग्लंडसाठी ब्रेंडन मॅकल्लमने प्रशिक्षकपदाचे काम सांभळताच त्यांनी संघात खुप बदल केले. त्यांनी संघात स्थान मिळत नसलेले अनुभवी गोलंदाज जेम्स ऍंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना संघात आणले. ओली पोपला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यास सुरुवात केली. ज्यामुळे जो रुटवरचा दबाव कमी होण्यास मदत झाली. तर भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघात सातत्य आणले. त्याचे उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेत भारताने ४ सामन्यात एकच संघ खेळवला. आवेश खानला सुरुवातीच्या तीन सामन्यात एकही बळी मिळाला नाही मात्र तरीही त्याला संघातून वगळले नाही.
आर नाही तर पार विरुद्ध प्रक्रियेवर ध्यान
मॅकल्लमने जोखीम उचलत आर नाही तर पार वृत्तीने खेळण्यासाठी खेळाडूंना प्रेरित करत मैदानावर उतरवले. खेळाडूंच्या तडाखेबाज फलंदाजीवरुन ते स्पष्ट होते. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने देखील म्हणले आहे की, मॅकल्लमने खेळाडूंचा खेळाप्रतीचा दृष्टीकोन बदलला आहे. कदाचीत त्यामुळेच संघ गेल्या ३ सामन्यात शेवटच्या डावात २७०हुन अधिक धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे राहुल द्रविड प्रक्रियेवर ध्यान देतात. ते वेळेनुसार निकाल देतात. त्यांनी ‘इंडिया ए’ चे प्रशिक्षक असताना अनेक पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यरसारखे अनेक खेळाडू घडवले आणि त्याचबरोबर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले.
युवा विरुद्ध अनुभव
ब्रेंडन मॅकल्लमने आपल्या प्रशिक्षक म्हणुन पहिल्या मालिकेतच तीन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. मॅथ्यु पोटस्बरोबर त्याने मॅट पार्किंसन आणि जेमी ओवरटन यांना संधी दिली. त्यात मॅथ्यु पोटस् आणि जेमी ओवरटन यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. तर द्रविड अनुभवावर जास्त विश्वास दाखवला आहे. त्याने मागील दोन वर्षात एकही शतक न लगावलेल्या चेतेश्वर पुजाराला इंग्लंड विरुद्ध स्थान मिळाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराचा अमेरिकेच्या मैदानात धुराळा, सलग दोन मॅचमध्ये बनला सामनावीर
दीपक हुड्डाचे शतक, संजू सॅमसनची वादळी खेळी; भारताचे आयर्लंडसमोर २२८ धावांचे भलेमोठे आव्हान
सामनावीर युझवेंद्र चहल बाकावर, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल; पाहा दोन्हीही संघ