बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीत भारतीय संघानं जो खेळ दाखवला, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. या सामन्यातील टीम इंडियाच्या आक्रमक फलंदाजीची बरीच चर्चा झाली. भारतीय संघातील या बदलाचं श्रेय बहुतांश चाहत्यांनी प्रशिक्षक गौतम गंभीरला दिलं आहे.
गौतम गंभीरची कोचिंगची शैली माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या पेक्षा वेगळी असल्याचं भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंचं मत आहे. खुद्द कर्णधार रोहित शर्मानंही हे मान्य केलंय. या लेखात आम्ही या दोन प्रशिक्षकाच्या कोचिंगमधील 5 मोठ्या फरकांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
(5) अनुभव – राहुल द्रविडच्या तुलनेत गौतम गंभीरचा कोचिंगचा अनुभव खूपच कमी आहे. टीम इंडियापूर्वी गंभीरनं कोणत्याही संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली नव्हती. आयपीएलमध्ये तो मेंटॉरच्या भूमिकेत दिसला होता. दुसरीकडे, द्रविडनं भारताच्या 19 वर्षाखालील संघात तसेच आयपीएलमध्ये आपल्या कोचिंगचा जलवा दाखवला होता.
(4) विचारसरणी – राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांच्या विचारसरणीत खूप फरक आहे. गंभीर खेळाडूंना आक्रमक वृत्तीनं खेळण्यास प्रेरित करते, जेणेकरून विरोधी संघ दबावाखाली येईल. मात्र काहीवेळा ही विचारसरणी संघावरच उलटू शकते. दुसरीकडे, द्रविड कठोर परिश्रम आणि लक्ष केंद्रित करून सामने जिंकण्यावर विश्वास ठेवतो.
(3) खेळाडूंची शिस्त – गौतम गंभीर हा असा प्रशिक्षक आहे, जो आपल्या संघातील खेळाडूंची पूर्ण काळजी घेतो. तो त्यांच्याबाबत कोणतीही कठोरता वापरत नाही. रविचंद्रन अश्विन यानं ही माहिती दिली आहे. त्यानं सांगितलं की, गंभीरच्या आगमनानंतर त्याला कोणतंही दडपण जाणवत नाही. तो खूप शांत आणि आरामदायी आहे. दुसरीकडे, द्रविडला शिस्तीनुसार कामं करणं पसंत होतं.
(2) आवडत्या खेळाडूंना सपोर्ट – गौतम गंभीर त्याच्या आवडत्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी ओळखला जातो. जेव्हापासून तो टीम इंडियाचा प्रशिक्षक बनला, तेव्हापासून केकेआरमधील काही खेळाडूंना सतत संधी मिळत गेली. श्रेयस अय्यर, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती याची उत्तम उदाहरणं आहेत. गंभीर यापूर्वी केकेआरचा मेंटॉर होता.
(1) प्रयोग करण्यास घाबरत नाही – गौतम गंभीर जेव्हापासून टीम इंडियाचा प्रशिक्षक बनला, तेव्हापासून प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना संधी मिळत आहे. संघानं कोणा एका खेळाडूवर अवलंबून राहू नये, अशी गंभीरची विचारसरणी आहे. त्यामुळे तो प्रयोग करण्यास मागेपुढे पाहत नाही. संघ व्यवस्थापनही आपल्या प्रशिक्षकाच्या निर्णयाचा आदर करताना दिसत आहे.
हेही वाचा –
श्रीलंका-पाक सामन्यात नवा राडा, रुमाल पडल्यानं फलंदाजाला जीवदान; नियम समजून घ्या
“जोपर्यंत धोनीची इच्छा आहे, तोपर्यंत आयपीएलचे नियम बदलत राहतील”, दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा
पृथ्वी शॉनं धो-धो धुतलं! कसोटीत टी20 स्टाईल फलंदाजी; फक्त एवढ्या चेंडूत ठोकलं अर्धशतक