आयपीएलचा फिरकीपटू दिग्वेश राठीने त्याच्या विकेट सेलिब्रेशन मागचं कारण सांगितले आहे. 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी खेळत असलेल्या दिग्वेशने त्याच्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत टाकले आहे. दिग्वेश सातत्याने चांगली गोलंदाजी करत विकेट घेण्याचं काम करत आहे. एवढेच नाही तर विकेट घेतल्यानंतर दिग्वेश त्याच्या हाताने काहीतरी लिहिण्याचा इशारा सुद्धा करतो, यासाठी त्याला बीसीसीआयने दंड सुद्धा ठेवलेला आहे.
दिग्वेश राठी विकेट घेतल्यानंतर फलंदाजाकडे जाऊन हातावर काहीतरी लिहिण्याचा इशारा करतो त्याचे हे सेलिब्रेशन पाहून बीसीसीआयने त्याच्यावर दंड ठोठावला होता. जेव्हा बीसीसीआयने त्याच्यावर दंड लगावला तेव्हा या फिरकीपटूने त्याच्या सेलिब्रेशनमध्ये बदल केला आणि यानंतर त्याने विकेट घेतल्यावर जमिनीवर काहीतरी लिहून सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला सुद्धा बीसीसीआयने मंजुरी दिली नाही.
अशा परिस्थितीत आता दिग्वेश राठी विकेट घेतल्यानंतर त्याच्या हातावर काहीतरी लिहिण्याचा इशारा करत विकेट घेतल्याचे सेलिब्रेशन करतो. त्यादरम्यान आता त्याने या सेलिब्रेशन मागचं कारण सांगितलं आहे. दैनिक जागरणला दिलेल्या इंटरव्यूमध्ये दिग्वेज राठीने या सेलिब्रेशन मागचं कारण स्पष्ट केलं आहे.
दिग्वेश राठी म्हणाला, तो नेहमीच बीसीसीआयने बनवलेल्या नियमांना बघूनच सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणाला, जर नियम पाळला नाही तर अडचण होईल. मी मानतो की, मी नियमांचं उल्लंघन करून सेलिब्रेशन केलं आहे. पण जिथे हातावर लिहून इशारा करत सेलिब्रेशन करण्याची गोष्ट आहे, तर मी एक नोटबुक घेऊन आलो होतो. मी त्यामध्ये त्या सर्व खेळाडूंचे नाव लिहितो ज्यांची मी विकेट घेतो. याच गोष्टीचे सेलिब्रेशन मी मैदानात विकेट घेतल्यानंतर करत असतो.
दिग्वेश राठीने सुनील नारायणला त्याचा आदर्श मानले आहे. राठी म्हणाला, नारायण यांची गोलंदाजी बघून मी खूप काही शिकलो आहे. मी त्यांच्याशी फक्त एकदा भेटलो आहे पण त्यांच्याशी गोलंदाजीविषयी माझं कोणतीही बोलणं झालं नाही. तुम्ही त्यांची गोलंदाजी बघून खूप शिकू शकता. मी आधी फलंदाजी करत होतो पण जेव्हा मी फलंदाजी करून थकायचो, तेव्हा मी गोलंदाजी करत असायचो. मी सुनील नारायण यांच्या गोलंदाजीची नक्कल करायचो.






