दिलदार पठाण भाऊ! लोकांना दिले एवढे मास्क

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशामध्ये भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसूफ पठाणने कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी ४००० मास्क दान केले आहेत.

भारतीय संघासाठी २९ कसोटी आणि १२० वनडे सामने खेळणाऱ्या इरफान पठाणने (Irfan Pathan) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्याने युसूफलाही टॅग केले आहे.

यामध्ये त्याने लिहिले की, “आम्ही आपल्या समाजासाठी एक छोटेसे योगदान करत आहोत. ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी एकमेकांना मदत करा. परंतु मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ देऊ नका. ही एक छोटी सुरुवात आहे. आशा आहे की, आम्ही आणखी मदत करत राहू.”

याबरोबरच इरफान या व्हिडिओमध्ये संदेश देत म्हणाला की, त्याचा भाऊ महमूद खान पठाणने चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने मास्क विकत घेतले आहेत. या ट्रस्टचे संस्थापक त्याचे वडील आहेत. तसेच त्याने पुढे सांगितले की, हे सर्व मास्क वडोदराच्या आरोग्य केंद्राला देण्यात आले आहेत. ते पुढे गरजूंना वाटतील.

ट्रेंडिंग घडामोडी-

-दुसऱ्यांदा बाप झालेल्या रैनाला थेट पाकिस्तानवरुन शुभेच्छा

-मंबई किनारी पाहिला डाॅल्फिन मासा, रोहित केले त्याचे खास स्वागत

-शमीला चाहते सध्या गद्दार का म्हणताय? काय आहे कारण?

You might also like