फक्त एका दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर संकटांचे डोंगर कोसळल्याचे आपण पाहिले आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या ४ सामन्यात त्याला बाहेर बसावे लागले. एवढेच नाही, तर या दुखापतीमुळे येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याला संधी देण्यात आली नाही. परंतु या शिलेदाराने स्वत:ला पूर्णपणे फिट असल्याचे सांगत मंगळवारी (३ नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पुनरागमन केले. पण रोहितच्या या हरकतीमुळे माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचा पारा चढला.
देश महत्त्वाचा का आयपीएल?
बीसीसीआयचे माजी संघ निवडकर्ता वेंगसरकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला बोलताना रोहितविषयीचा राग व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित अनफिट असल्याचे सांगितले होते. याचमुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. परंतु हा खेळाडू तर आयपीएलमध्ये त्याच्या मुंबई संघाकडून खेळत आहे. तसेच संघाचे नेतृत्त्वही करत आहे.”
“मला नक्की कळत नाही की, रोहितसाठी भारत देशाकडून खेळणे जास्त महत्त्वाचे आहे का या टी२० लीगमध्ये खेळणे?” असा प्रश्न पुढे वेंगसरकर यांनी रोहितला विचारला.
वेंगसरकर यांच्या त्या प्रश्नामुळे अनेक प्रश्नांना वाचा फुटला आहे. रोहित या प्रश्नाचे नक्की काय उत्तर देईल? रोहितसाठी देशापेक्षा आयपीएलमध्ये खेळणे जास्त महत्त्वाचे आहे का? आता बीसीसीआय यावर काही कारवाई करेल का? का बीसीसीआयच्या फिजिओनेच रोहितच्या दुखापतीविषयी चुकीची माहिती दिली? असे कित्येक प्रश्न पुढे येऊ लागले आहेत.
पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला फ्लॉप
शारजाहच्या मैदानावर हैदराबादविरुद्ध झालेल्या या हंगामातील अंतिम सामन्यातून रोहितने आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र आपल्या पुनरागमनाला तो सार्थ ठरवू शकला नाही. सलामीला फलंदाजीला येत ७ चेंडूत केवळ ४ धावा करत तो बाद झाला. तर शेवटी हैदराबादनेही या सामन्यात मुंबईला १० विकेट्सने मात दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
गुड न्यूज.! हैदराबादविरुद्ध हिटमॅन मैदानात, रोहित शर्माची विरोधकांना जोरदार चपराक
रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार? सौरव गांगुलीने दिले ‘हे’ उत्तर
रोहित शर्मा कधी करणार पुनरागमन? पाहा पोलार्ड काय म्हणतोय
ट्रेंडिंग लेख-
हैदराबादची प्ले ऑफमध्ये दिमाखात एन्ट्री; ‘या’ ३ कारणांमुळे मुंबईचा दारुण पराभव
वनडेत १७४ चेंडूत नाबाद ३६ धावा करणाऱ्या गावसकरांनी एकदा सेहवाग स्टाईल केली होती गोलंदाजांची धुलाई
आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…