नवी दिल्ली। श्रीलंकेच्या निवडकर्त्यांनी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ज्या खेळाडूला कर्णधारपदावरून हटविले होते तसेच त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान दिले नव्हते, आज तोच खेळाडू पुन्हा एकदा आपल्या लयीत आला आहे. तो खेळाडू इतर कोणी नसून श्रीलंकेचा माजी कर्णधार दिनेश चंदीमल आहे. त्याने घरगुती क्रिकेटमध्ये ताबडतोब त्रिशतक ठोकले आहे.
त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना सारासेन्स स्पोर्ट्स क्लबविरुद्ध ८ षटकार आणि २९ चौकारांच्या मदतीने आपल्या ३०० धावा पूर्ण केल्या आहेत. म्हणजेच त्याने केवळ चौकार- षटकारांच्या मदतीने १६४ धावा ठोकल्या आहेत.
चंदीमलचे आपल्या कारकिर्दीतील हे पहिलेच त्रिशतक आहे. यापूर्वी त्याची सर्वोच्च धावसंख्या ही २४४ इतकी होती, जी त्याने १० ऑगस्ट, २०१० साली दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध खेळताना केली होती.
दिनेश चंदीमलची चमकदार कामगिरी
चंदीमलने सारासेन्स स्पोर्ट्स क्लब संघाच्या गोलंदाजांना चांगलेच चिंतेत टाकले होते. त्याने आपला २५ वे प्रथम श्रेणी शतक १४९ चेंडूत पूर्ण केले. यानंतर त्याने २०० धावांपर्यंतचा प्रवास हा २८८ चेंडूंपर्यंत पूर्ण केला. पाहता पाहता त्याने आपले त्रिशतकही ठोकले. त्याने ३९१ चेंडूत नाबाद ३५४ धावांची त्रिशतकी खेळी केली आहे. यात ९ शतके आणि ३३ चौकारांचा समावेश आहे.
चंदीमल हा श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
श्रीलंका क्रिकेट इतिहासात आतापर्यंत केवळ १० फलंदाजांनी त्रिशतक ठोकले आहे. त्यात ३७४ धावांच्या खेळीसह माहेला जयवर्धने अव्वल क्रमांकावर आहे. सोबतच किथरूवन विथांगेने ३५१ धावांची खेळी केली आहे. चंदीमलने श्रीलंकेचा दिग्गज माजी कर्णधार कुमार संगाकारा (३१९) आणि फलंदाज सनथ जयसूर्या (३४०) यांना मागे टाकले आहे.
चंदीमलची प्रथम श्रेणी कारकीर्द आहे शानदार
चंदीमलच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यात त्याने चमकदार कामगिरी केली आहे. चंदीमलने १२० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २४ शतके आणि ४१ अर्धशतकांच्या मदतीने जवळपास ८,५०० पेक्षा अधिक धावा ठोकल्या आहेत.
श्रीलंका संघाकडून खेळताना त्याने ५७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४०.८१ च्या सरासरीने ३८७७ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ११ शतकेही ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-चुकिला माफी नाही! धोनीसह ‘या’ खेळाडूंना द्यावी लागणार मोठी अग्निपरीक्षा
-पाकिस्तानच्या सगळ्या प्रशिक्षकांना थेट जगाच्या यात्रेवर पाठवा, दिग्गज कडाडला
-एकदाही शून्यावर बाद न होता आयपीएलमध्ये ३ वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा धुरंदर
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलचे तब्बल १२ हंगाम एकाच संघाकडून खेळणारा तो एकटा क्रिकेटर
-जगातील आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ क्रिकेटरबद्दल १० माहित नसलेल्या गोष्टी
-इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान या ४ ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर असेल आयपीएल फ्रेंचायझीचीं नजर