---Advertisement---

एकदाही शून्यावर बाद न होता आयपीएलमध्ये ३ वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा धुरंदर

On: गुरूवार, ऑगस्ट 27, 2020 7:51 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२०ची (आयपीएल) सुरुवात व्हायला जवळपास ३ आठवड्यांचा कालावधी उरला आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पाहता आयपीएलचा तेरावा हंगाम यंदा संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये आयोजन्यात आला आहे. अशात चाहत्यांची नजर केवळ आयपीएलवर खिळली आहे.

२० षटकांच्या या जगप्रसिद्ध लीगमध्ये एकापेक्षा एक दमदार खेळाडू खेळताना दिसतात. आणि जिथे दमदार खेळाडू असतात, तिथे दमदार विक्रम होतात. आयपीएलमधील विक्रमांची तर गोष्टच निराळी आहे. आयपीएलमध्ये अनेक अनोखे विक्रमांची नोंद आहे, जे सर्वांना चकित करण्याजोगे आहेत. असाच एक विक्रम म्हणजे, आयपीएलमध्ये ३ वेळा ऑरेंज कॅप मिळवणे, तेही एकदा पण शून्यावर बाद न होता. Only One Player Who Got Orange Cap In IPL 3 Times Without Scoring Duck In All Season

आयपीएल इतिहासात हा अनोखा आणि शानदार विक्रम ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याच्याव्यतिरिक्त आजवर कोणत्याही फलंदाजाने हा विक्रम केलेला नाही.

२०१५, २०१७ आणि २०१९मध्ये वॉर्नरला ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) मिळाली होती. दरम्यान या तिन्ही हंगामात एकाही सामन्यात तो खाते न उघडता अर्थात शून्यावर बाद न होता मैदानाबाहेर गेला नाही. सनराइजर्स हैद्राबादचा कर्णधार वॉर्नरने २०१५साली पूर्ण हंगामात १४ सामने खेळत ५६२ धावा केल्या होत्या. तर, २०१७मध्ये १४ सामन्यात ६४१ आणि २०१९मध्ये १४ सामन्यात ६९२ धावा करत वॉर्नर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.

वॉर्नरव्यतिरिक्त ३ अजून ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शून्यावर बाद न होता ऑरेंज कॅप विजेते बनले आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामात शॉन मार्शने पूर्ण हंगामात ११ सामन्यात एकदाही शून्यावर बाद न होता ६१६ धावा ठोकल्या होत्या. तर, २००९मध्ये मॅथ्यू हेडनने १२ सामन्यात एकदाही शून्यावर बाद न होता ५७२ धावा केल्या होत्या. आयपीएल २०१३मध्ये मायकल हसीने हा पराक्रम केला होता. यावेळी त्याने पूर्ण हंगामात १७ सामने खेळत ७३३ धावा केल्या होत्या. दरम्यान तो एकदाही शून्यावर बाद झाला नव्हता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही २०१०मध्ये एकदाही शून्यावर पव्हेलियनला न जाता पूर्ण हंगामात सर्वाधिक धावा केल्या होत्या. यावेळी त्याने १५ सामन्यात ६१८ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---