---Advertisement---

FIFA World Cup 2026: 10 खेळाडूंसह अमेरिकेचा ऐतिहासिक विजय! गोल करणाऱ्या खेळाडूवर एका सामन्याची बंदी

On: गुरूवार, जुलै 2, 2026 11:00 AM
---Advertisement---

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सध्या बाद फेरीचे सामने (राऊंड ऑफ ३२) सुरू आहेत. यामध्ये आज (२ जुलै) अमेरिका विरुद्ध बोस्निया आणि हर्झेगोविना सामना कॅलिफोर्नियातील लेव्हीज स्टेडियमवर रंगला. या रोमांचक सामन्यात अमेरिकेने बोस्निया आणि हर्झेगोविनाला २-० ने पराभूत करत पुढील फेरीत प्रवेश केला.

या सामन्यात यजमान संघाने शेवटची २६ मिनिटे १० खेळाडूंसह खेळली आणि दुसऱ्यांदा त्यांच्या फुटबॉलच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामना जिंकण्याची कामगिरी केली. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकर फोलारिन बालोगन आणि मलिक टिलमन ठरले. दोघांनी केलेल्या गोलच्या जोरावर अमेरिकेने ‘राऊंड ऑफ १६’ मध्ये प्रवेश केला. यामध्ये त्यांचा सामना बेल्जियमशी होणार आहे.

बालोगनने या सामन्याचे पहिले सत्र गाजवले. त्याने ३१ व्या मिनिटाला गोल केला, मात्र पंचांनी त्याला ऑफसाईड घोषित केले. अखेर ४५ व्या मिनिटाला त्याला यश आले आणि अमेरिकेसाठी पहिला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याचा हा या स्पर्धेतील तिसरा गोल आहे.

दुसऱ्या सत्रात मात्र अमेरिकेला धक्का बसला. रेफरीने बालोगनला रेड कार्ड दिले. त्याने बोस्नियाच्या तारिक मुहरेमोविचच्या घोट्यावर पाय ठेवल्याने त्याला सामन्याबाहेर पडावे लागले आणि अमेरिकेने शेवटची २६ मिनिटे १० खेळाडूंसह खेळली. तसेच बालोगुन आता राऊंड ऑफ १६ ला मुकणार आहे. त्यामुळे तो बेल्जियमविरुद्ध खेळू शकणार नाही. (Folarin Balogun get Red Card)

विश्वचषकाच्या इतिहासात रेड कार्ड मिळवणारा बालोगन पाचवा अमेरिकेचा खेळाडू ठरला. १९९० मध्ये एरिक वायनाल्डा, १९९४ मध्ये फर्नांडो, २००६ मध्ये पाब्लो मास्ट्रोनी आणि एडी पोप या अमेरिकेच्या खेळाडूंना रेड कार्ड मिळाले होते.

विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात गोल केला आणि त्यानंतर ‘रेड कार्ड’ मिळालेले खेळाडू-
१ ब्राझीलच्या गॅरिंचाला १९६२ च्या उपांत्य फेरीत चिलीविरुद्ध
२ ब्राझीलच्या रोनाल्डिन्होला २००२ च्या उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध
३ फ्रान्सचा झिनेदिन झिदानला २००६ च्या अंतिम सामन्यात इटलीविरुद्ध
४ अमेरिकेचा फोलेरिन बालोगनला २०२६ ‘राऊंड ऑफ 32’ मध्ये बोस्निया आणि हर्झेगोविनाविरुद्ध

या सामन्यात एका खेळाडूच्या कमतरतेमुळे शेवटच्या क्षणी अमेरिकेच्या कामगिरीवर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांच्या बचावफळीने उत्तम कामगिरी केली. ८२ व्या मिनिटाला टिलमनने गोल करत अमेरिकेची आघाडी २-० केली. तो गोल रोखण्याचा प्रयत्न बोस्नियाच्या गोलकीपरने केला, मात्र तो अपयशी ठरला आणि अमेरिकेने आपला विजय निश्चित केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---