महिला टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडनेही विजेतेपदाच्या लढतीत आपले नाव फिक्स केले आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा पराभव केला, तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत धडक मारण्याचा आणि सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे.
महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासावर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलिया हा सर्वात यशस्वी संघ असल्याचे दिसून येते. ऑस्ट्रेलियन संघाने सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठली आहे, तर इंग्लंडने पाचव्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. याउलट, भारतीय संघ या यादीत खूप मागे आहे. भारताने केवळ एकदाच महिला टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. ज्यामध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
या यादीत न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर असून त्यांनी तीन वेळा अंतिम सामना खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेने दोनदा अंतिम फेरी गाठली आहे, तर वेस्ट इंडीज आणि भारताने प्रत्येकी एकदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वेस्ट इंडीजने आपल्या एकमेव अंतिम फेरीच्या संधीचे रूपांतर विजेतेपदात करण्यात यश मिळवले होते.
महिला टी-20 विश्वचषकात सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठणारे संघ
8 – ऑस्ट्रेलिया
5 – इंग्लंड
3 – न्यूझीलंड
2 – दक्षिण आफ्रिका
1 – वेस्ट इंडीज
1 – भारत
या सहा संघांशिवाय इतर कोणत्याही देशाने महिला टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठलेली नाही. या स्पर्धेची 10वी आवृत्ती सध्या सुरू असून आता केवळ अंतिम सामना बाकी आहे. ऑस्ट्रेलिया विक्रमी आठव्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. शिवाय सहा वेळा विजेतेपद पटकावल्यामुळे स्पर्धेतील या संघाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या नऊ आवृत्त्यांपैकी ऑस्ट्रेलियाने विक्रमी सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे. याव्यतिरिक्त, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या प्रत्येकाने एकदा महिला टी-20 विश्वचषक जिंकला आहे.






